शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

एस. टी. चालकास मोबाइल परत, रिक्षाचालकाचा डाव उधळवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 01:52 IST

काँग्रेस पदाधिकाऱ्याने रिक्षाचालकाचा डाव उधळवला

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एस. टी.मध्ये गहाळ झालेल्या वस्तू प्रामाणिकपणे प्रवाशांना परत देणाऱ्या एस. टी. चालकाचाच मोबाईल फोन ठाण्यात गहाळ झाला. यावेळी काही प्रवाशांच्या तत्परतेला काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मिळालेल्या साथीने तो बळकावू पाहणाऱ्या रिक्षाचालकाचा डाव उधळून तो पुन्हा मूळ मालक असलेले ठाणे- पुणे एसटीचे चालक गौतम कांबळे यांना परत करण्यात यश आले. हा प्रकार बुधवारी घडला असून, मोबाईल परत मिळाल्यावर नेहमी प्रवाशांचा एस. टी.मध्ये हरवलेल्या वस्तू देताना फोटो काढतात, त्याचप्रमाणे एसटी चालक कांबळे यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत एक फोटो काढून त्यांचे आभार मानले.

नौपाडा परिसरात काही जण रिक्षाचालकासोबत वाद घालत होते. त्यातील एका ओळखीच्या व्यक्तीने ठाणे शहर काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांना आवाज दिला. आवाज ऐकून ते काय प्रकार चालू आहे हे जाणून घेण्यासाठी तेथे गेले. त्यावेळी मोबाईलवरून तेथे वाद सुरू असल्याचे त्यांच्यासमोर आले. तो माझा फोन आहे, असे रिक्षाचालक सांगत होता, तर ते प्रवासी तो फोन रिक्षाचालकाचा नसल्याचे सांगत होते. याचदरम्यान, पिंगळे यांनी काही प्रश्न रिक्षाचालकाला विचारले असता त्याला मोबाईची ओळख पटवून देता आली नाही. त्यातच त्याने तिथून हळूच पळ काढला. त्यानंतर थोड्याच वेळात त्या मोबाईलवर फोन आला. मी एसटीचालक गौतम कांबळे बोलतोय. तो माझा मोबाईल आहे. आपण कुठे आहात, मी कुठे येऊन घेऊ, अशी विचारणा केली. त्यावेळी पिंगळे त्यांनी तुम्ही कुठेही येऊ नका आम्ही मोबाईल घेऊन वंदना एस. टी. स्टँडला येतो, असे सांगितले. तत्पूर्वीच चालक कांबळे हे एस. टी. प्रवाशांना घेऊन तेथे पोहोचले होते. मोबाईल पाहताच कांबळे यांना खूप आनंद झाला. यावेळी पिंगळे यांच्यासोबत  सुशील वाघुले, दीपक नरे, संजय गौड  व प्रवासी होते.

एस. टी. कर्मचारी हसतमुख, तुटपुंजा पगारातही प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. त्यामुळे ते खरे कोरोना योद्धे आहेत. कोरोनाच्या कठीण काळात जीवाची पर्वा न करता डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांची वाहतूक केली. एस. टी. कर्मचारी प्रवाशांना दैवत समजून करत असलेल्या सेवेचा सार्थ अभिमान आहे. अशातच मिळालेला मोबाईल कांबळे यांना परत करण्याची संधी मिळाली.    -  राहुल पिंगळे, अध्यक्ष, ओबीसी विभाग, ठाणे.

टॅग्स :thaneठाणेMobileमोबाइल