शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

Thane Politics: सत्ताधारी शिवसेना आवाज दाबते; राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांचे एकत्रित आयुक्तांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 18:29 IST

Thane Politics: राज्या प्रमाणे ठाण्यातही महाविकास आघाडीच्या माध्यमातून मागील काही दिवपार्पयत काम सुरु होते. परंतु मागील काही दिवसापासून विरोधी पक्षनेते शाणु पठाण यांनी सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात मोर्चा उघडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : राज्यात एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार एकत्रित काम करुन भाजपचे मनसुबे हाणुन पाडण्याचे काम करीत असतांना दुसरीकडे ठाण्यात मात्र सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने भाजपबरोबर एकत्रित येऊन सत्ताधारी शिवसेना विरोधकांचा आवाज दाबत असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी आणि भाजपने गुरुवारी एकत्रित येऊन शिवसेनेच्या या कृतीच्या विरोधात थेट महापालिका आयुक्तांना निवेदन दिल्याची माहिती समोर आली आहे. ठाणो महापालिका एक प्रा. लिमिटेड कंपनी झाली असल्याचा आरोपही यावेळी या नगरसेवकांनी केली आहे.

राज्या प्रमाणे ठाण्यातही महाविकास आघाडीच्या माध्यमातून मागील काही दिवपार्पयत काम सुरु होते. परंतु मागील काही दिवसापासून विरोधी पक्षनेते शाणु पठाण यांनी सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. नालेसफाईंचा मुद्दा असो किंवा शहरातील झाडांच्या पडझडीचा मुद्दा किंवा कोरोना बाधीत रुग्णांना ऑक्सीजनचा मुद्दा असो अशा अनेक मुद्यावरुन शाणु पठाण यांनी सत्ताधा:यांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच भाजपचा आवाज देखील महासभेत म्युट केला जात असल्याचे प्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे भाजपकडून सुरु असलेल्या आरोपांना शिवसेनेकडून उत्तरे देणो सुरु असतांनाच आता त्यांच्या महाविकास आघाडीत असलेल्या राष्ट्रवादीकडून देखील महापालिका प्रशासनावर अर्थात शिवसेनेवर टिका सुरु केली आहे. महासभेत नगसेवकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप यावेळी या तीनही पक्षाच्या नगरसेवकांनी केला. २०१४ पासून सभागृह अतिशय चुकीच्या पध्दतीने सुरु असल्याचा आरोपही यावेळी राष्ट्रवादीने केला आहे. हम करे सो कायदा म्हणत येथे शिवसेनेची प्रशासनाला हाताशी धरुन हुकुमशाही सुरु असल्याचा आरोपही यावेळी या नगरसेवकांनी केला आहे. नगरसेवकांना आपला आवाज महासभेच्या माध्यमातून पोहचविण्याची संधी असते. मात्र तिथेच आवाज दाबला जात आहे. चर्चा न करता ठराव पास केले जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. ठराविक नगरसेवक बोललात बाकींच्याना बोलण्याचा अधिकार नाही, ही कोणती हुकुमशाही आहे. असा सवालही यावेळी त्यांनी केला. त्यामुळे या संदर्भात आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून यावर योग्य तो निर्णय घेतला गेला नाही तर महासभेच्या दिवशी सभागृहाबाहेर बसून आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसेल असेही यावेळी या नगरसेवकांनी स्पष्ट केले.

एकूणच राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्येही कॉंग्रेसने बिबा घालण्याचे काम सुरु केले असतांनाच आता स्थानिक पातळीवर सत्ताधारी शिवसेनेच्या एक कलमी कार्यक्रमाच्या विरोधात कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शिवसेनेला एकाकी पाडण्याचे काम येत्या काही दिवसात करण्याची रणनिती तर आखली जात नाही ना? अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे.

लोकांच्या समस्या मांडण्यासाठी महासभा हे एकमेव व्यासपीठ आहे. परंतु तेथे केवळ ठराविक नगरसेवकांनाच बोलायला दिले जात आहे. इतर नगरसेवकांचा आवाज दाबला जात आहे. त्यामुळे महासभेत बोलू दिले जाणार नसले तर यापुढे सभागृहाबाहेर आंदोलन केले जाईल.(शाणु पठाण - विरोधी पक्षनेते, ठामपा)

२०१४ पासून महापालिकेचे सभागृह चुकीच्या पध्दतीने सुरु आहे. कोरोनाच्या काळात वेबीनारद्वारे सभा घेतो, त्यात मोठे विषय असतांना सुध्दा त्यावर चर्चा केली जात नाही. विरोधात मत मांडले तर त्याचा आवाज म्युट केला जातो, हा लोकशाहीचा अपमान आहे. सभागृहातील चर्चा आणि होणारे ठराव यात फार मोठी तफावत आढळून आलेली नाही. त्यामुळे हे कामकाजही चुकीच्या पध्दतीने सुरु आहे. त्यामुळे यापूर्वी चुकीच्या पध्दतीने झालेले ठराव पुन्हा तपासण्यात यावे. लसीकरण समप्रमाणात होत नाही, यातही काही ठराविक नगरसेवकांकडे झुकते माप दिले जात आहे.(हणमंत जगदाळे - जेष्ठ नगरसेवक, राष्ट्रवादी)

विशिष्ट पक्षाची हुकुमशाही, विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीच्या माध्यमातून सभागृह चालणार असेल तर ते चुकीचे आहे. यात पालिकेतील अधिकारी देखील सामील असतील तर त्याचा आम्ही निषेध करीत आहोत, आज मान देऊन तुमच्या दालनात आलो आहोत, परंतु उद्या जर यावर योग्य तो निर्णय झाला नाही, तर आंदोलन उभे करु. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून कारभार करावा, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील.(विक्रांत चव्हाण - नगरसेवक , कॉंग्रेस, ठाणे )

महासभेत विरोधकांचे आवाज म्युट केले जात आहे. वेबीनारद्वारे झालेल्या सभांमध्ये मर्जीतील नगरसेवकांना बोलू दिले जात आहे. दादगिरीने ठराव पास केले जात आहे, जे शहराच्या दृष्टीने महत्वाचे ठराव आहेत, ते अद्यापही धुळ खात पडून आहेत. परंतु काही ठराव अवघ्या तीन मिनिटात पास केले जात आहेत. आयत्या वेळेचे ठरावही चुकीच्या पध्दतीने केले जात आहे. त्यामुळेच यापुढे असे घडू नये या दृष्टीकोणातून ही भेट घेण्यात आली.(मनोहर डुंबरे - गटनेते, भाजप)

चौकट - राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यासह इतर नगरसेवक  मात्र यावेळी आयुक्तांच्या भेटीला गेल्याचे दिसून आले नाही. यावेळी केवळ निवेदन देण्यासाठी भाजप बरोबर जाणार असल्याचे समजल्यानंतर या नगरसेवकांनी जाण्यास इन्कार केला.

कोणाचेही आवाज म्युट केले जात नाही - नरेश म्हस्केही हास्यास्पद गोष्ट आहे, आवाज म्युट करणो याचा अर्थ त्यांनी समजून घेतला पाहिजे, मी कोणाला म्युट करीत नाही, तेच एकमेकांना म्युट करीत असतात. खासकरुन भाजपमध्ये स्पर्धा असते, एखादा भाजपचा नगरसेवक बोलू लागला की, दुसरा नगरसेवक बोलायला लागतो आणि एका मागून एक बोलू लागतात आणि त्यांच्याच स्पर्धा रंगत असते. बाहेरुन आलेले आणि भाजपमध्ये असलेल्यांनामध्ये ही स्पर्धा आहे, ब:याचदा त्यांचे नेटवर्क गायब होते, एका वेळेस एकच जण बोलणो अपेक्षित आहे. परंतु दुसरा बोलायला लागल्यावर त्याला शांत बसायला सांगितले जाते. परंतु आयुक्तांकडे तक्रार करणो अयोग्य आहे. त्यांनी पिठासीन अधिकारी म्हणून माङयाकडे तक्रार करणो गरजेचे आहे. एखाद्याला बोलू देणो किंवा न बोलू देणो हा माझा अधिकार आहे, त्यामुळे त्यांच्यात जर हिम्मत होती तर त्यांनी माङयाकडे येणो गरजेचे होते. सध्या यांना विषय नाही, त्यामुळे काही तर विषय पाहिजे म्हणून केवळ प्रसिध्दीसाठी हा स्टंट होता.(नरेश म्हस्के  - महापौर, ठामपा)

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका