आरटीओने केली ८५ हजारांची दंडात्मक कारवाई
By Admin | Updated: January 12, 2017 07:13 IST2017-01-12T07:13:31+5:302017-01-12T07:13:31+5:30
ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत सुरू असलेल्या २८ वा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ठाणे विभागात राबवलेल्या वाहन

आरटीओने केली ८५ हजारांची दंडात्मक कारवाई
ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत सुरू असलेल्या २८ वा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ठाणे विभागात राबवलेल्या वाहन तपासणी मोहिमेत ८५ हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये सर्वाधिक विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या ५० मोटारसायकलस्वारांचा समावेश आहे.
रविवारी आरटीओच्या रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी दिवसभर वाहन तपासणीची विशेष मोहिम हाती घेत, आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक दत्तात्रेय खराडे, श्याम चौधरी, सुजित जमाकर, कलबीरसिंग कलसी, सुरेश आव्हाड आणि मदन आवटी या वायुवेग पथकामार्फत ठाणे शहरातील घोडबंदर रोड, सिडको, वर्तकनगर, साके त रोड आदी ठिकाणी तपासणी करताना, १२६ वाहन चालकंनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले. यामध्ये विना हेल्मेट-५०, वीना सीट बेल्ट-३१, ब्लॉक फिल्मस्- ११, अवैध प्रवासी वाहतूक-२१, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे-१० आणि फॅन्सी नंबर प्लेट-३ अशा १२६ केसेस् करून त्यांच्याकडून नव्या दंडानुसार एकूण ८५ हजारांचा दंड वसूल केला. (प्रतिनिधी)