भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 14:37 IST2021-02-17T14:36:28+5:302021-02-17T14:37:28+5:30

Bhiwandi Building Collapse : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही आर्थिक मदत देण्यास मान्यता दिली आहे. 

Rs 3 lakh help to the relatives of the victims of the Jilani building accident in Bhiwandi | भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत

भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत

ठळक मुद्देएकूण १ कोटी १४ चौदा लाख रुपयांचे अर्थसहाय्य संबंधित ३८ मृतांच्या नातेवाईकांना जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडून वितरीत होणार आहे.

मुंबई - भिवंडीतील जिलानी इमारत दूर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही आर्थिक मदत देण्यास मान्यता दिली आहे. 

भिवंडी तालुक्यातील नारपोली येथील पटेल कंपाऊंड मधील जिलानी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३८ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृतांच्या कायदेशीर वारसांस मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून प्रत्येकी रुपये तीन लाख देण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यानुसार एकूण १ कोटी १४ चौदा लाख रुपयांचे अर्थसहाय्य संबंधित ३८ मृतांच्या नातेवाईकांना जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडून वितरीत होणार आहे.

Web Title: Rs 3 lakh help to the relatives of the victims of the Jilani building accident in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.