आरपीएफ जवानाचा मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली स्थानकात रूळ ओलांडताना मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 09:48 IST2018-01-04T09:48:04+5:302018-01-04T09:48:22+5:30

मध्य रेल्वेवर डोंबिवली- ठाकुर्लीस्थानकादरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना गिरीश मुझुमदार (वय 40 वर्ष) या रेल्वे पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे.

The RPF jawan died while crossing the track at Thakurli station on Central Railway | आरपीएफ जवानाचा मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली स्थानकात रूळ ओलांडताना मृत्यू

आरपीएफ जवानाचा मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली स्थानकात रूळ ओलांडताना मृत्यू

डोंबिवली - मध्य रेल्वेवर डोंबिवली- ठाकुर्लीस्थानकादरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना गिरीश मुझुमदार (वय 40 वर्ष) या रेल्वे पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (3 जानेवारी) रात्री 11 ते 11.20 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. गिरीश मुझुमदार ठाकुर्ली खंबालपाडा परिसरातील लक्ष्मीपार्क सोसायटीत वास्तव्याला होते, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.  

ठाकुर्ली स्थानकातून कल्याणच्या दिशेनं रूळ ओलांडून पूर्वेला जाण्याचा प्रयत्न गिरीश यांना केला असता हा अपघात घडल्याची माहिती रेल्वे पोलीस दलातील अधिका-यांनी लोकमतला दिली. मृत गिरीश मुझुमदार हे एलटीटी येथे कार्यरत होते. बुधवारी रात्री ड्युटी संपून ते घरी जात असताना हा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. 
 

Web Title: The RPF jawan died while crossing the track at Thakurli station on Central Railway