लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: घरात भावाशी झालेल्या रागातून अलाहाबाद येथून रेल्वेने मुंबईत बहिणीकडे जात असतांना ठाणे स्थानकात भरकटलेल्या अल्पवयीन मुलीला शनिवारी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी तिच्या बहिणीकडे सुपूर्द केले. आरपीएफने दाखविलेल्या या प्रसंगावधानामुळे आपली बहिण सुखरुप परत मिळाल्यामुळे मुंबईतील साकीनाका येथील तिच्या बहिणीने पोलिसांसह रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास मोनाली (नावात बदल) ही दहा वर्षांची मुलगी रडत असल्याचे, ठाण्यातील अरपीएफ जवानांच्या लक्षात आले. प्रचंड भेदरलेली ही मुलगी सुरुवातीला कोणाशी काहीच बोलायला तयार नव्हती. त्यामुळे तिचा नेमकी पत्ताही शोधणे अवघड झाले होते. आरपीएफचे प्रमोद देने आणि रेल्वे चाईल्ड लाईनच्या सुस्मिता काटकर यांनी आरपीएफ च्या कार्यालयात आणून तिला विश्वासात घेतले. तेंव्हा मुळची अलाहाबाद येथे राहणारी असून भाऊ आणि भावजयीबरोबर भांडण झाले. त्यामुळे रागातून मुंबईतील बहिणीकडे रेल्वेने जात असल्याचे तिने या आरपीएफच्या पोलिसांना सांगितले. केवळ एका चिठ्ठीवर बहिणीचा मोबाईल क्रमांक तिच्यावर होता. या पलिकडे मुंबईत कुठे जायचे? याची काहीच माहिती तिच्याकडे नव्हती. अखेर तिच्याकडील त्या मोबाईल क्रमांकाच्या आधाराने कुर्ला, साकिनाका येथील तिच्या बहिणीकडे पोलीस उपनिरीक्षक सोनाली मलैया यांनी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सुखरुप बहिणीच्या स्वाधीन केले. आपली बहिण सुखरुप मिळाल्यामुळे या बहिणीचे डोळे आनंदाने पाणावले होते.
अलाहाबाद येथून ठाणे स्थानकात भरकटलेली अल्पवयीन मुलगी आरपीएफने केली बहिणीकडे सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 00:23 IST
घरात भावाशी झालेल्या रागातून अलाहाबाद येथून रेल्वेने मुंबईत बहिणीकडे जात असतांना ठाणे स्थानकात भरकटलेल्या अल्पवयीन मुलीला शनिवारी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी तिच्या बहिणीकडे सुपूर्द केले.
अलाहाबाद येथून ठाणे स्थानकात भरकटलेली अल्पवयीन मुलगी आरपीएफने केली बहिणीकडे सुपूर्द
ठळक मुद्दे भावाशी भांडण झाल्याने गेली घरातून निघून मुंबईतील बहिणीला शोधतांना भरकटली