शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी...', अजित पवार यांचं विधान
3
"कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
4
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
5
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
6
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
7
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
8
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
9
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
10
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
11
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
12
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
13
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
14
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
15
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
16
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
17
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
18
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
19
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
20
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

रस्ते सुरक्षा सप्ताह: बाइकचे ‘धूम’शान जीवघेणे! जनजागृतीबरोबर कडक कारवाई हवी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 12:36 AM

रस्ते सुरक्षा सप्ताह आला की, वाहतुकीच्या नियमांचे पालन करा, असे जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जातात. सेलिब्रिटींना आणून कार्यक्रम होत असले तरी वस्तुस्थिती लपून राहत नाही. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात दुचाकी विशेषत: स्पोर्ट्स बाइकची क्रेझ तरुणांमध्ये वाढताना दिसत आहे. बेदरकार वाहन चालवण्यामुळे अपघातांचा आलेख चढता राहिला आहे. अपघात रोखणे ही जशी चालकाची जबाबदारी आहे, तसे नियम पाळणे हे त्याचे कर्तव्य आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने घेतलेला हा आढावा...

जितेंद्र कालेकरठाणे : ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीसारख्या गजबजलेल्या शहरांमध्ये ताशी १५० ते २०० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या स्पोर्ट्स बाइक्स योग्य प्रशिक्षणाच्या, सुरक्षा उपाययोजनांच्या अभावी चालवणे पादचाऱ्यांसाठी तसेच चालकांकरिता धोकादायक ठरत आहेत. अशा बाइकर्सवर नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे मत वाहतूक पोलिसांनी व्यक्त केले आहे. मात्र लक्षावधी रुपये किमतीच्या या बाइक्स चालवणारे बरेचदा शहरांतील उद्योगपती, राजकीय नेते, माफिया यांच्या कुटुंबातील तरुण असल्याने ते पोलिसांना जुमानत नाहीत. अपघात झाल्यास पैसे चारून किंवा दबाव टाकून प्रकरण मिटवण्याकडे त्यांचा कल असतो.

एकेकाळी वाहतुकीची गरज असलेली दुचाकी आता खास लांब पल्ल्याचे अंतर कमी वेळात कापण्यासाठी तसेच हौस म्हणून वेगाने पळविण्यासाठी वापरली जाऊ लागली आहे. त्यामुळे १०० सीसीची इंजिन क्षमता असलेल्या बाइक्सऐवजी थेट १२०० ते २७०० सीसी इंजिन क्षमतेच्या बाइक्स वापरण्याकडे तरुणाईचा कल आहे. 

इंजिनच्या या भरमसाट क्षमतेमुळे बाइक्सचा वेगही वाढला आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे एकीकडे मोठा वर्ग बेकारी, भूक वगैरेचा सामना करीत असताना दुसरीकडे ठाण्यात जानेवारी २०२० ते जानेवारी २०२१ या वर्षभरात दहा लाख ते २१ लाख किमतीच्या २२ दुचाकींची नोंदणी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली.एका नामांकित कंपनीची ही स्पोर्ट्स बाईक २१ लाख १५ हजारांची, तर दुसरी २० लाख ७५ हजारांची आहे. तिचे नोंदणी शुल्क हे अडीच हजार असून रस्ता कर हा चार लाख २३ हजारांच्या घरात आहे. तर एक बाईक दहा लाखांच्या घरात आहे. काहींनी अन्यत्र आपल्या बाइक्सची नोंदणी करूनही त्या ठाण्यात आणल्या आहेत. अशा या महागड्या स्पोर्ट्स सुपर बाइक्स काही जणांसाठी स्टेट्स सिम्बॉल आहेत.

असे आहेत धोकेकमी वयात योग्य प्रशिक्षण न घेतलेले १८ ते २४ वयोगटातील अनेक तरुण या मोटरसायकली वेगाने चालवितात. अनेकदा रात्रीच्या वेळी या स्पोर्ट्स बाइक्सची रेस लावली जाते किंवा एकाच वेळी धूम धूम या बाइक्स पळवून रात्रभरात लांबचा पल्ला गाठून पहाटेपर्यंत पुन्हा ठाणे गाठले जाते.  अनेकदा एका चौकातून दुसऱ्या चौकात या बाइक्स जाईपर्यंत सिग्नल लागलेला असतो. कधी कधी एखादा पादचारी अचानक मध्ये आल्याने भीषण अपघात होतो. यात पादचारी किंवा या चालकाचाही मृत्यू ओढवतो. अलीकडेच दहा दिवसांपूर्वी नवी मुंबईतील पाम बीच रोडवर धूम चित्रपटात दाखविलेली महागडी स्पोर्ट्स बाईक चालविणाऱ्याचा मृत्यू झाला. ही दुचाकी खरेदी केल्यानंतर अवघ्या चौथ्या दिवशीच चालकाचा मृत्यू झाला.

ठाण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे निरीक्षक गुणवंत निकम यांनी सांगितले की, अशा दुचाकी चालविताना वेगळे जॅकेट (रायडिंग सूट), हेल्मेट आणि शूजची गरज असते. अशीच एखादी नवी गाडी घेतली की, तिचा वेग किती ठेवायचा, तो नियंत्रित कसा करायचा, याचा अंदाज न आल्यामुळे अनेकदा अपघात होतो. अनेक पालक मुलांच्या हट्टापायी त्यांना स्पोर्ट्स बाईक घेऊन देतात. पण त्यांना योग्य प्रशिक्षण आणि सुरक्षित प्रवासाकरिता सूट देणे अपेक्षित आहे. 

निरीक्षक गुणवंत निकम हे स्वत: अशा सुपर बाईक चालवितात. त्यांनी अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर या बाईक कशा चालवायच्या, कोणते धोके टाळायचे, ४००पेक्षा अधिक सीसीच्या आणि जास्त हॉर्सपॉवरच्या गाड्या कशा चालवायच्या याचाही अचूक अंदाज येणे गरजेचे आहे. ताशी १५० किमीपेक्षा अधिक वेग नसावा, कॉर्नर कसा घ्यावा, दोन वाहने आल्यास कोणत्या लेनमध्ये असावे, याचे मोफत प्रशिक्षण निकम आणि त्यांचा ग्रुप देत असतो. रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांविरुद्ध कलम १८४ नुसार वाहतूक पोलीस कारवाई करतात. शिवाय, अपघाताचीही भीती असते, त्यामुळे योग्य वेगातच या सुपर बाइक्स चालविण्याचा सल्ला आरटीओ अधिकाऱ्यांनी दिला आहे.

सुपर बाइक्सच्या वेडापायीच एका प्रसिद्ध क्रिकेटपटूच्याही मुलाला जीव गमवावा लागला. ३३ हॉर्स पॉवर इंजिन ही दैनंदिन वापराची बाईक असते, तर ३३ ते १०० हॉर्स पॉवरची बाईक अनुभवी चालकांसाठी असते. १०० पेक्षा अधिक हॉर्स पॉवरच्या बाइक्स या सुपर बाइक्समध्ये मोडतात. परदेशात अशा सुपर बाइक्ससाठी वेगळे लायसन्स असते. शिवाय, ते २४व्या वर्षी मिळते. भारतात १८व्या वर्षी लायसन्स मिळते. त्यामुळे सुपर बाइक्ससाठी वेगळे लायसन्स दिले जावे, असे मत निकम यांनी व्यक्त केले.बऱ्याचदा शनिवार, रविवारी या स्पोर्ट्स बाईकवरून लांबच्या पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक अपघात याच दिवशी झाले आहेत. नेमकी याच दोन दिवशी सुट्ट्यांमुळे रस्त्यांवर वाहनांची गर्दी असते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाbikeबाईक