झाडाची फांदी तुटून पडल्याने रिक्षाचालक जखमी; पारसिकनगर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 22:20 IST2021-09-01T22:09:57+5:302021-09-01T22:20:00+5:30
Thane News : कळवा येथील पारिसक नगर सर्कल जवळील अमित गार्डन हॉटेलसमोर एका झाडाची फांदी अचानक तुटून रस्त्याने जाणाऱ्या रिक्षावर तुटून पडली.

झाडाची फांदी तुटून पडल्याने रिक्षाचालक जखमी; पारसिकनगर येथील घटना
ठाणे : कळव्यातील रेतीबंदर परिसरात एका झाडाची फांदी तुटून रिक्षावर आदळल्याने झालेल्या अपघातात रिक्षा चालक अब्दुल शेख (४२, रा. भिवंडी) हा जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामुळे काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
कळवा येथील पारिसक नगर सर्कल जवळील अमित गार्डन हॉटेलसमोर एका झाडाची फांदी अचानक तुटून रस्त्याने जाणाऱ्या रिक्षावर तुटून पडली. यावेळी रिक्षा चालक शेख यांच्या डोक्याला आणि चेहºयावर किरकोळ जखम झाली असून त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच ठाणे पालिका आपत्ती व्यवस्थापन पथक आणि कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तुटलेली फांदी हटवून या भागातील वाहतूक सुरळीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.