अंबरनाथच्या सीएनजी पंपावर रिक्षाच्या सिलेंडरचा स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 20:19 IST2019-10-29T20:17:30+5:302019-10-29T20:19:36+5:30
अंबरनाथच्या सीएनजी पंपावर एका ऑटो रिक्षामध्ये गॅस भरत असतांना त्यातील सिलेंडचा स्फोट होवून रिक्षाला आग लागली.

अंबरनाथच्या सीएनजी पंपावर रिक्षाच्या सिलेंडरचा स्फोट
अंबरनाथ : अंबरनाथच्या सीएनजी पंपावर एका ऑटो रिक्षामध्ये गॅस भरत असतांना त्यातील सिलेंडचा स्फोट होवुन रिक्षाला आग लागली. सुदेवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. पंपावरील कर्मचा-यांनी सतर्कता दाखवत ही आग विझवली. स्फोट येवढा मोठा होता की त्या स्फोटानंतर नागरिकांची धावाधाव सुरू झाली. शेजारी असलेल्या वाहनांचेही त्यात नुकसान झाले.
अंबरनाथ फॉरेस्ट नाक्यावर असलेल्या सीएनजी पंपावर आज दुपारी तीनच्या सुमारास एक रिक्षा गॅस भरण्यासाठी आली होती. यावेळी गॅस भरत असतांना सीएनजीच्या सिलेंडरचा स्फोट झाला. सुदेवाने गॅस भरत असतांना कर्मचारी आणि ऑटो रिक्षा चालक गाडीपासुन लांब होते. त्या स्फोटानंतर मागे उभ्या असलेल्या रिक्षाचेही त्यात नुकसान झाले. हा स्फोट नेमका कशामुळे घडला याची माहिती मिळालेली नाही. मात्र स्फोटाच्या प्रकारानंतर नागरिकांमध्ये दहशतिचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी असलेल्या कर्मचा-यांनी लागलीच ही आग आटोक्यात आणली. या स्फोटात कोणालाही गंभिर दुखापत झालेली नाही.