शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा व्यवसाय अद्यापही थंडच, मालक-चालक चिंतित; रेल्वे सेवेवरच व्यवसाय अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 00:53 IST

कल्याण-डोंबिवलीकर नोकरी, व्यवसायानिमित्त ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरात ये-जा करतात. त्यामुळे ते बहुतांशी वाहतुकीसाठी रेल्वेवरच अवलंबून आहेत.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत लॉकडाऊन शिथिल होऊन पंधरवड्यापेक्षा अधिक दिवस झाले तरी व्यवसाय हवा तसा तेजीत येत नसल्याने रिक्षामालक-चालक चिंतित आहेत. मार्चअखेरीपासून लॉकडाऊन असल्याने रिक्षा व्यावसायिक आधीच घरात होते. तर, आता लॉकडाऊन झाल्यानंतरही प्रवाशांच्या प्रतीक्षेत रस्त्यावर वेळ जात आहे. दिवसाकाठी जेमतेम ४०० ते ५०० रुपये धंदा होत आहे. लोकल सेवा सुरू होत नाही तोपर्यंत व्यवसायाला झळाळी येणार नाही, असे मत रिक्षा चालकांनी व्यक्त केले.

कल्याण-डोंबिवलीकर नोकरी, व्यवसायानिमित्त ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरात ये-जा करतात. त्यामुळे ते बहुतांशी वाहतुकीसाठी रेल्वेवरच अवलंबून आहेत. डोंबिवलीमधून सुमारे साडेचार लाख, तर कल्याणमधून अडीच लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. त्यापैकी बहुतांशी नागरिक हे घर ते रेल्वे स्थानक रिक्षानेच प्रवास करतात. रेल्वेवरच व्यवसाय अवलंबून असल्याचे मत रिक्षाचालकांनी व्यक्त केले.लॉकडाऊन शिथिल झाल्याने दुकाने, बाजारपेठा उघडल्या आहेत. रक्षाबंधन, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी तेथे गर्दी झाली. मात्र, रिक्षांना प्रवासीच नाहीत. दुसरीकडे खाजगी कंपन्याही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे काही कर्मचारी कंपन्यांच्या खाजगी बस तसेच एसटीने प्रवास करतात. अत्यावश्यक सेवेतील बहुतांश प्रवासी दुचाकीनेच रेल्वे स्थानक गाठतात. त्यामुळे रिक्षा व्यवसायाला तेजी नाही.आताही १५ दिवसांपासून सकाळचे ६ ते ९ वाजेपर्यंतचे तीन तास सोडले, तर अन्य वेळी फारसा व्यवसायच होत नाही, असे रिक्षाचालकांनी सांगितले. डोंबिवली पूर्वेला इंदिरा गांधी चौक, पाटकर रस्ता, केळकर तसेच रामनगर स्टॅण्ड परिसरात रिक्षा दिसतात. मात्र, तेजी नसल्याने अनेक रिक्षा चालक दुपारनंतर वाहन बाहेर काढत नाहीत.रेल्वे सेवेवरच रिक्षा व्यवसाय अवलंबून आहे, असे म्हणणे वावगे नाही. अजूनही व्यवसायाला तेजी नाही. जेमतेम ४०० रुपये सरासरी व्यवसाय होत आहे. तातडीने रेल्वे सुरू होणे गरजेचे आहे. - दत्ता माळेकर, कल्याण जिल्हाध्यक्ष, वाहतूक सेल भाजपरिक्षाव्यावसायिक आता घरातून बाहेर पडले आहेत. पण, त्यांना प्रवासी मिळत नाहीत. कसाबसा दिवस निघत असला तरी चिंता कायम आहे. आणखी रिक्षा रस्त्यावर आल्यास जो धंदा होतो तोही होणार नाही. - काळू कोमासकर, अध्यक्ष, लालबावटा रिक्षा युनियन

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे