शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेविका सुजाता पारधींवरील कारवाईचा आयुक्त घेणार आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 18:47 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेतील भाजपा नगरसेविका सुजाता पारधी यांच्याकडून सरकारी अनुदानासह नगरसेवक पदावरील लाभ, असे बेकायदेशीर दुहेरी लाभ घेतला जात असल्याच्या तक्रारीवरून राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला कार्यवाही करण्याचे निर्देश लेखी पत्राद्वारे दिले आहेत.

राजू काळेभार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेतील भाजपा नगरसेविका सुजाता पारधी यांच्याकडून सरकारी अनुदानासह नगरसेवक पदावरील लाभ, असे बेकायदेशीर दुहेरी लाभ घेतला जात असल्याच्या तक्रारीवरून राज्य निवडणूक आयोगाने पालिकेला कार्यवाही करण्याचे निर्देश लेखी पत्राद्वारे दिले आहेत. मात्र त्यापासून आयुक्तांना अनभिज्ञच ठेवण्यात आल्याने त्यांनी त्याचा आढावा घेऊन कार्यवाही करणार असल्याची माहिती लोकमतला दिली.पालिकेच्या आॅगस्ट २०१७ मधील सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग १४ मधील ब जागेवर विजयी झालेल्या भाजपाच्या सुजाता पारधी यांनी शिक्षक पदाचा राजीनामा न देताच पदावर कार्यरत राहून निवडणूक लढविली. नगरसेवकपदी निवडून आल्यानंतरही त्यांनी नोकरीचा राजीनामा न देताच त्यांनी दुहेरी आर्थिक लाभ मिळवित असल्याची तक्रार भिवंडी तालुक्यातील दुधणी येथील आदिवासी विकास संस्थेने राज्य निवडणूक आयोगाकडे २८ नोव्हेंबर २०१७ रोजी केली.पारधी या भार्इंदर पूर्वेकडील अभिनव विद्यालय या खासगी अनुदानित शाळेत शिक्षक पदावर कार्यरत होत्या. त्यांना दोन महिन्यांपूर्वीच या शाळेच्या सेवेतून मुक्त करण्यात आल्याचे शाळेकडून सांगण्यात आले आहे. यावरून त्यांनी नगरसेवकपदावर राहून सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१७ दरम्यान सरकारी अनुदानातून वेतन मिळविले. त्यातच पालिकेकडुन नगरसेवकांना विविध भत्यांच्या माध्यमातुन दिले जाणारे दरमहा सुमारे १० हजार रुपये देखील मिळविले.दोन्ही आस्थापनांकडून दुहेरी सरकारी लाभ मिळवित त्यांनी सरकार तसेच पालिकेची फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. सध्या त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कळवा येथील एका शाळेत कार्यरत असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. यावरून पारधी यांच्याकडून सरकारी अनुदानासह पालिकेच्या भत्याचा दुहेरी लाभ अद्यापही घेतला जात असल्याचे स्पष्ट झाले असुन त्यांना त्वरीत नगरसेवकपदावरुन निलंबित करावे, अशी मागणी संस्थेकडून करण्यात आली आहे. राज्य निवडणुक आयोगाने देखील संस्थेच्या या आरोपांची दखल घेत पालिकेला योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश ६ जानेवारीला पाठविलेल्या पत्राद्वारे दिले आहेत. मात्र या पत्राची माहिती अद्याप आयुक्तांना न दिल्याने ते अनभिज्ञनच राहिल्याचे त्यांच्याकडे विचारणा केल्यानंतर समोर आले आहे. मात्र त्यांनी त्याचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती लोकमतला दिली. तसेच नियम तपासूनच पारधी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.प्रभाग क्रमांक ११अ मधून विजयी झालेले सेनेचे नगरसेवक अनंत शिर्के हे मुंबई महापालिकेत नोकरीला होते. त्यांनी निवडणुक लढवितेवेळीच नोकरीचा राजीनामा दिला. असे असतानाही पारधी यांना सत्ताधारी भाजपाच्या दबावाखाली प्रशासनाकडून वेगळा न्याय देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपा