शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एमजेपीवर २२७ कोटी रुपये खर्चाच्या शहापूर पाणीपुरवठा प्रकल्पाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 01:17 IST

जीवघेण्या पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या शहापूर तालुक्यातील गावपाड्यांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी इगतपुरीजवळील भावली धरणातून पाणी उचलण्यात येणार आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : जीवघेण्या पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या शहापूर तालुक्यातील गावपाड्यांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी इगतपुरीजवळील भावली धरणातून पाणी उचलण्यात येणार आहे. या पाणीपुरवठा योजनेवर २२७ कोटी ३८ लाख रूपये खर्च होणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्ण कामाची जबाबदारी ठाणे जिल्हा परिषदेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर (एमजेपी) नुकतीच सोपवली आहे.उन्हाळ्यात शहापूर तालुक्यातील गावपाडे तीव्र पाणीटंचाईला तोंड देतात. या तालुक्यात मुंबई महापालिकेसह अन्यही शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणे आहेत. मात्र, त्यातील पाणी या तालुक्यातील गावखेड्यांना मिळत नाही. यामुळे शहापूर हा आदिवासी तालुका तीव्र पाणीसमस्येच्या चक्र व्युहात सापडलेला आहे. यावर मात करण्यासाठी इगतपुरी तालुक्यामधील डोंगरपरिसरात असलेल्या भावली धरणातील पाणी शहापूरच्या ९७ गावांसह २५९ पाड्यांना पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. डोंगर उतारावरून येणारे हे पाणी शहापूरच्या या गावखे्यांना पुरवण्यात येणार आहे. गुरूत्वाकर्षणावर आधारीत या प्रादेशिक नळपाणीपुरवठ्यावर तब्बल २२७ कोटी ३८ लाख रुपये खर्च होणार आहे. या प्रकल्पाचे पूर्ण काम एमजेपीव्दारे करण्याच्या ठरावाला ठाणे जिल्हा परिषदेने नुकतीच मंजुरी दिली आहे.नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरीच्या डोंगर पठारावर भावली धरण आहे. या धरणातील पाणी पठाराखाली असलेल्या शहापूर तालुक्यामधील गावपाड्यांना पुरवता येणार आहे.प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू‘ग्रीड’ पद्धतीवर आधारीत हा प्रकल्प एमजेपीने युद्धपातळीवर सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेने संमती दिली आहे. एमजेपीकडून या कामास विलंब होणार नाही, अल्पावधीतच या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासह त्याचा लाभ शहापूरच्या या टंचाईग्रस्त गावखेड्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Waterपाणीshahapurशहापूर