शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

श्वसनाच्या रुग्णांमध्ये 40 टक्के वाढ, टॉवर संस्कृतीमध्ये उंचावर राहणा-यांना होतो सर्वाधिक त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 04:08 IST

दिवाळीत उडवण्यात येणा-या फटाक्यांमधील विषारी घटकांमुळे श्वसनाच्या विकारांत व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची वाढ झाली असून ही वाढ सुमारे ३० ते ४० टक्के असल्याची माहिती श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. संगीता चेकर यांनी दिली.

राजू काळे भाईंदर : दिवाळीत उडवण्यात येणा-या फटाक्यांमधील विषारी घटकांमुळे श्वसनाच्या विकारांत व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची वाढ झाली असून ही वाढ सुमारे ३० ते ४० टक्के असल्याची माहिती श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. संगीता चेकर यांनी दिली.दिवाळीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली एनसीआरमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली होती व त्यांनतर महाराष्ट्रात सुद्धा निवासी संकुलामध्ये फटाके विक्रीला न्यायालयाने बंदी घातली होती. तरीही लक्ष्मी पूजनाच्या व पाडव्याच्या आतषबाजीनंतर मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील वायू प्रदूषणात मोठी भर पडली आहे. या महानगरांमधील हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट पातळीपर्यंत घसरली आहे. दिल्लीमध्ये गेल्यावर्षी दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुराची एवढी गडद चादर पसरली की तेथील शाळांना सुटी देणे भाग झाले होते. फटाके फोडल्यानंतर त्यातून सल्फरडाय आॅक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बनडाय आॅक्साईड आणि नायट्रेस गॅसेस बाहेर पडतात. त्याचा सर्वाधिक त्रास अस्थमाच्या रुग्णांना होतो. लहान मुले, वृद्ध यांना श्वसनाचे आजार होतात.दिवाळीच्या दिवसांत व त्यानंतर दोन दिवसांत श्वसनाच्या विकारांचे ३० ते ४० टक्के नवे रूग्ण येतात. ज्यांना पूर्वी कधीही अस्थमा किंवा श्वसनचा त्रास नव्हता. लहान मुलांची फुफुसे छोटी असल्याने त्यांना फटाक्यांच्या धुराचा अधिक त्रास होतो. याविषयी अधिक माहिती देताना डॉ. चेकर यांनी सांगितले की, फटाक्यांमधील विषारी घटक असतात. ती धूराच्या स्वरुपात हवेत बराच काळ राहतात. त्यामुळे दिवाळीनंतर श्वसनाच्या व अस्थमाच्या पेशंटमध्ये वाढ होते.मुंबई व ठाणे या शहरांचा विचार करता काळाच्या ओघात येथील चाळ संस्कृती नष्ट होऊन उंचच उंच टॉवर संस्कृती उदयास आली आहे. या उंच इमारतींमध्ये राहणाºयांना फटाक्यांच्या धुराचा अधिक त्रास होतो. कारण फटाक्यांमुळे हवेत सोडले जाणारे विषारी घटक जमिनीपासून ५०० ते हजार फुटावर तरंगत राहतात. त्यामुळे टॉवरमधील ज्येष्ठ तसेच लहान मुलांना श्वसनाचा त्रास होतो.>मालाडमध्ये सर्वाधिक वायू प्रदूषणकेंद्र सरकारच्या ‘सफर’ या वायू प्रदूषण मोजणाºया संस्थेच्या या वर्षीच्या अहवालानुसार मुंबई, पुणे, नवी मुंबई या शहरांचे प्रदूषण कमालीचे वाढले असून प्रदूषित वायूंची तसेच ‘पर्टिक्युलेट मॅटर’ म्हणजेच घनरूप दूषित कणांची उपस्थिती धोक्याच्या पातळीवर दाखवली आहे. सफरच्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड भागात शहरातील सर्वाधिक वायू प्रदूषण आहे. या उपनगरातील हवेचा दर्जा केवळ खालवलाच नसून घातक पातळीपर्यंत पोहोचला आहे. आधीच वायूप्रदूषण अधिक असलेल्या मुंबईत दिवाळीच्या दिवसांत अस्थमा रूग्णांना राहणे मुश्कील होते.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक