मंत्र्यांच्या दत्तक गावी विकासाचा ठणठणाट; 3 वर्षात एकदाही फिरकल्या नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 06:51 IST2019-01-29T23:01:38+5:302019-01-30T06:51:18+5:30
गोरेगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या भाजपच्या आमदार व महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी पालघर जिल्हातील नांदगाव तर्फे मनोर हे गाव ९/११/२०१६ रोजी दत्तक घेतले.

मंत्र्यांच्या दत्तक गावी विकासाचा ठणठणाट; 3 वर्षात एकदाही फिरकल्या नाहीत
मनोर : पालघर तालुक्यातील पूर्व भागात येणारे नांदगावतर्फेमनोर गाव हे आमदाराने दत्तक घेऊन ३ वर्षे झाली तरी त्यात कोणतेही विकास कार्य न झाल्याने ग्रामस्थ संतप्त झआले आहेत. थाटामाटात गाव दत्तक घेण्याचा सोहळा झाला. परंतु प्रत्यक्ष विकास शून्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना होती की, प्रत्येक आमदाराने एक गाव दत्तक घेऊन ते आदर्श ठरेल असा त्याचा विकास घडवावा. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी गोरेगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या भाजपच्या आमदार व महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी पालघर जिल्हातील नांदगाव तर्फे मनोर हे गाव ९/११/२०१६ रोजी दत्तक घेतले. त्यावेळी त्यांनी घोषित केले होते की, आजपासून या गावाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी माझी मात्र त्यानंतर त्या गेल्या तीन वर्षे पासून येथे फिरकल्याही नाहीत. सरपंच पवन सवरा उपसरपंच यांनी ठाकूर यांची भेट घेतली, समस्या मांडल्या. नांदगाव नाक्यावरील पुलाची गरज सांगितली. त्यातील एकही काम केले गेले नाही. सरपंच पवन सवरा म्हणाले की, मी सरपंच झाल्या पासून ग्रामपंचायतचे सर्व सदस्य ग्रामसेवक यांचे सहकार्यने प्रयत्न करून ग्रामपंचयत मध्ये राबविले जाणारे योजनाचे निधी आणून कामे मार्गी लावले आहेत.
आज गावात जे काही थोडे फार विकास कार्य दिसते आहे, ते मी आमच्यापरीने प्रयत्न करून आणलेल्या निधीतून घडविलेले आहे. त्यात ठाकूर यांचे योगदान शून्य आहे. महिला बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्याशी सम्पर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल रिसीव्ह केला नाही. त्यामुळे त्यांनी या गावासाठी काय केले? हे कळाले नाही. - पवन सवरा, सरपंच