शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

भातसा धरणातून आरक्षित पाणी मिळावे; भिवंडी पालिकेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 11:07 PM

वाढत्या लोकसंख्येनुसार अपुरा पुरवठा, प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला

वासिंद : भिवंडी महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या, नागरीकरण यामुळे अपुरी पाणी समस्या जाणवत असल्याने शहराला भातसा धरणातून आरक्षित पाणी मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेले भातसा धरणाचे पाणी शेती सिंचन तसेच व इतर वापरासाठी उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती, कारखाने, वीजनिर्मिती प्रकल्प, भातशेती यांच्यासह ठाणे व मुंबई महापालिका यांच्या मागणीनुसार पाणी पुरवठा करण्यात येतो. या धरणाची ९७६.१० दशलक्ष घनमीटर पाणी क्षमता असून सध्या ७३५.०६८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे.ठाणे, मुंबई महापालिका बरोबरच वाढत्या पाण्याच्या गरजेनुसार भिवंडी महापालिकेनेही शहराला १०० दशलक्ष लिटर पाणी मिळावे अशी मागणी केली असून हा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला असल्याचे भातसा कालवा विभागाकडून सांगण्यात आले.भातसा नदीजवळ असलेल्या शहापूर, कल्याण व इतर तालुक्यातील ३८ ग्रामपंचायती, जे.एस.डब्ल्यू, व लिबर्टी कंपनी तसेच भातसाधरण, सरलांबे, खुटघर, कासगांव येथील वीजनिर्मिती प्रकल्प केंद्र यांना पाणी दिले जाते. त्याचबरोबर ठाणे, मुंबई महापालिकेच्या मागणीनुसार पाणी पुरवठा केला जात असून सध्या ठाणे २०० दशलक्ष लिटर तर मुंबई १८५० दशलक्ष लिटर रोजची मागणी आहे. हंगाम लागवडीसाठी सध्या उजव्या तीर (कालव्याद्वारे) १७५ क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. भातसा धरणातील पाणी भातसा उजवा कालवाद्वारे हंगाम भातशेतीसाठी तर भातसा नदीतून पिसे बंधाऱ्यापर्यंत पोहचवून त्यानंतर ठाणे-मुंबई शहराला पुरवठा तसेच नदीतून इतरांना वापरासाठी उचलले जाते.

टॅग्स :Damधरण