खाडीमध्ये अडकलेल्या वैफल्यग्रस्त तरूणीची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 14:19 IST2020-02-26T14:15:13+5:302020-02-26T14:19:09+5:30
तिला कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

खाडीमध्ये अडकलेल्या वैफल्यग्रस्त तरूणीची सुटका
ठळक मुद्दे नसीम शेख या १९ वर्षीय वैफल्यग्रस्त तरूणीची ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने बुधवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सुखरुप सुटका केली.माहिती मिळल्यानंतर तातडीने या पथकाने अर्ध्या तासात तिची सुटका केली.
ठाणे - बाळकूम पाडा क्रमांक तीन गणेश विसर्जन घाटाजवळील खाडीमध्ये अडकलेल्या नसीम शेख या १९ वर्षीय वैफल्यग्रस्त तरूणीची ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने बुधवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सुखरुप सुटका केली. ती खाडीमध्ये अडकल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळल्यानंतर तातडीने या पथकाने अर्ध्या तासात तिची सुटका केली. तिला कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.