कळव्यातील विवाहितेवर लैंगिक अत्याचार, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 22:29 IST2017-10-05T22:29:14+5:302017-10-05T22:29:31+5:30
कळवा येथील एका २५ वर्षीय विवाहितेवर त्याच परिसरात राहणा-या महाजन नावाच्या व्यक्तीने ती घरात एकटी असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार नुकताच घडला.

कळव्यातील विवाहितेवर लैंगिक अत्याचार, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
ठाणे : कळवा येथील एका २५ वर्षीय विवाहितेवर त्याच परिसरात राहणा-या महाजन नावाच्या व्यक्तीने ती घरात एकटी असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार नुकताच घडला. याप्रकरणी तिने कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कळवा परिसरात राहणारी पीडित विवाहिता २३ सप्टेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६.१५ वा.च्या सुमारास घरात एकटीच असताना महाजन याने तिच्या घरात अचानक शिरकाव केला. घरात इतर कोणीच नसल्याची संधी साधून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. शिवाय, तिचीच त्याने परिसरात बदनामी करण्यास सुरुवात केली. अखेर, या प्रकाराला कंटाळून तिने ४ आॅक्टोबर रोजी याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित आरोपीचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.