शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

टोरंटच्या विरोधात कळवा-मुंब्रातील आगरी युवकांचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 6:31 PM

येथील शासकीय विश्रामगृहा समोर कळवा, मुंब्रा परिसरातील नागरिकांसह महिलानी देखील या धरणे आंदोलन सहभाग घेऊन टोरंटच्या वीज पुरवठ्याच्या सेवेस विरोध दर्शविला. आगरी युवक संघटना प्रमुख गोविंद भगत यांच्या नेतृत्वाखाली आज हे धरणे आंदोलन छेडले. यावेळी या आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांचे भेट घेऊन त्यांना टोरंटच्या विरोधातील निवेदनाव्दारे मागण्या केल्या

ठळक मुद्दे कंपनीच्या कामगारांनी जातीवाचक शिविगाळ केल्याच्या निषेधार्थ आगरी युवक संघटना प्रमुख गोविंद भगत यांच्या नेतृत्वाखाली आज हे धरणे आंदोलन भिवंडीतूनही या कंपनीची हकालपट्टी करण्याची मागणी

ठाणे : येथील कळवा, मुंब्रा, कौसा, शीळ परिसरातील नागरिकाना वीज पुरवठा व त्याचे बील वसुलीचा ठेका टोरंट या खाजगी कंपनीला देऊ नका, या मागणीसह या कंपनीच्या कामगारांनी जातीवाचक शिविगाळ केल्याच्या निषेधार्थ आगरी युवक संघटनेच्या नेतृत्वाखाली या परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सोमवारी धरणे आंदोलन करून टोरंटला कडाडून विरोध केला.       येथील शासकीय विश्रामगृहा समोर कळवा, मुंब्रा परिसरातील नागरिकांसह महिलानी देखील या धरणे आंदोलन सहभाग घेऊन टोरंटच्या वीज पुरवठ्याच्या सेवेस विरोध दर्शविला. आगरी युवक संघटना प्रमुख गोविंद भगत यांच्या नेतृत्वाखाली आज हे धरणे आंदोलन छेडले. यावेळी या आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांचे भेट घेऊन त्यांना टोरंटच्या विरोधातील निवेदनाव्दारे मागण्या केल्या आहेत. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या धरणे आंदोलनास शुक्रवारी परवानगी नाकारली होती. मात्र आज दिलेल्या परवानगीस अनुसरून कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करून टोरंटला विरोध केला.       कळवा, मुंब्रा, शीळ या उपविभागात टोरंटला वीज वितरण व त्याच्या बील वसुलीचा ठेका युतीच्या सरकारने दिला होता. मात्र आता त्यास स्थगिती दिलेली आहे. या कंपनीला कार्यादेशही दिलेले नाही. ते कार्यादेश कायम ठेवून या कंपनीला ठेका देऊ नये या प्रमुख मागणीसह या परिसरातील वीज बील वसुली ९० टक्के वाढलेली असल्यामुळे आता या परिसरात खाजगी कंपनीला ठेका देऊ नका असेही या आंदोलन कर्त्यांनी निवेदनात स्पष्ट केले. भिवंडीत तीन हजार ५८६ गुन्हे कंपनीने नोंदवले आहेत. ते निर्दोष असल्याचे सिध्द करण्यास कंपनीला सांगितले होते, मात्र ते कंपनीला करता आलेले नाही. यामुळे भिवंडीतूनही या कंपनीची हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी लावून धरली. राज्य शासनास चुकीची माहिती देऊन टोरंट प्रशासनाची दिशाभूल करीत असलयामुळे या कंपनीला या सेवेतून बडतर्फ करावे आदी मागण्या या वेळी आंदोलन कर्त्यांनी लावून धरत टोरंट विरोधात घोषणा यावेळी दिल्या.............फोटो - ०६ठाणे धरणे आंदोलनकॅप्शन - येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आगरी युवक संघटना प्रमुख गोविंद भगत यांच्या नेतृत्वाखाली धरणे आदोलनास बसलेले कार्यकर्ते

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी