ठाणे जिल्हा प्रशासनाच्या धडक कारवाईत दिव्यामधील १५०० घरांचे अतिक्रमण जमीनदोस्त

By सुरेश लोखंडे | Published: January 6, 2020 06:16 PM2020-01-06T18:16:19+5:302020-01-06T18:21:20+5:30

युपी, बिहार, ओरिसा व अन्य राज्यातील या चाळींमध्ये वास्तव्यास होते. भूमाफियांनी कांदळवन नष्ट करून या सरकारी जमिनीवर बिनदिक्कत या ३९ चाळींचे बांधकाम केले होते. त्यातील घरे अल्प किंमतीत या युपी, बिहारमधून आलेल्या रहिवाश्यांना विकून भूमाफिये सध्या फरार आहेत. या कारवाईच्या प्रारंभ रहिवाशांनी दुपारी १२च्या दरम्यान कडाडून विरोध केला. येथील युवक,युवती आणि महिलां जेसीबी समोर उभ्या राहून या कारवाईस विरोध केला होता. यावेळी काही तरूणांनी तर जेसीबीवर जावून चालकास दम देण्याचाही प्रयत्न केला. या रहिवाश्याांचा रोष लक्षात घेऊन प्रशासनाने कारवाई काही काळ थांबवली

Thane district administration raids two houses in Diu |  ठाणे जिल्हा प्रशासनाच्या धडक कारवाईत दिव्यामधील १५०० घरांचे अतिक्रमण जमीनदोस्त

कांदळवनाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या ३९ चाळी बेकायदेशीर अतिक्रमण ठाणे जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करून आज जमीन दोस्त केले

Next
ठळक मुद्देसरकारी भूखंड व कांदळवनाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या ३९ चाळी बेकायदेशीर अतिक्रमणएक हजार ५०० खोल्या पोलिस व एसआरपीच्या कडक बांदोबस्तात तोडण्यात आल्या३५० पोलिस अधिकाऱ्यांचे मनुष्यबळ


ठाणे : दिवा डंपिंगच्या बाजूस असलेल्या सरकारी भूखंड व कांदळवनाच्या जागेवर बांधण्यात आलेल्या ३९ चाळी बेकायदेशीर अतिक्रमणठाणे जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करून आज जमीन दोस्त केले. या चाळींमधील १५०० पेक्षा अधिक घरे जेसीबी, पोकलन मशीनच्या सहायाने तोडण्यात आली. गेल्या काही वर्षांमधील ही सर्वात मोठी कारवाई जिल्हा प्रशासनाने सोमवारी चोख पोलिस बंदोबस्तात पार पाडली आहे. सुमारे अडीच ते तीन एकरवरील अतिक्रमणे आज पाडण्यात आली आहे.
      युपी, बिहार, ओरिसा व अन्य राज्यातील या चाळींमध्ये वास्तव्यास होते. भूमाफियांनी कांदळवन नष्ट करून या सरकारी जमिनीवर बिनदिक्कत या ३९ चाळींचे बांधकाम केले होते. त्यातील घरे अल्प किंमतीत या युपी, बिहारमधून आलेल्या रहिवाश्यांना विकून भूमाफिये सध्या फरार आहेत. या कारवाईच्या प्रारंभ रहिवाशांनी दुपारी १२च्या दरम्यान कडाडून विरोध केला. येथील युवक,युवती आणि महिलां जेसीबी समोर उभ्या राहून या कारवाईस विरोध केला होता. यावेळी काही तरूणांनी तर जेसीबीवर जावून चालकास दम देण्याचाही प्रयत्न केला. या रहिवाश्याांचा रोष लक्षात घेऊन प्रशासनाने कारवाई काही काळ थांबवली.
         रहिवाश्यांचा उद्रेक लक्षात घेऊन काही काळ कारवाई थांबविल्यानंतर प्रशासनाने पुन्हा मेगाफोनच्या सहायाने रहिवाश्यांना शांत राहण्याचा सांगितले. आम्ही फक्त समोरच्या दुकाने असलेले गाळे तोडणार आहोत. न्यायालयाच्या आदेशास अनुसरूनही कारवाई केली जात आहे. त्यानुसार केवळ समोरचे दुकाने तोडण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन प्रशासनाने केले. तर पोलिसांनी जमा झालेली गर्दी हटविली आणि दुपारी दीड वाजता पुन्हा कारवाई सुरू झाली. एका वेळी पाच चाळी जेसीबीच्या सहायाने तोडण्यास प्रांरभ झाला. यावेळी मात्र पोलिसांच्या भिती दाखल एकही रहिवाशी व महिलांनी या कारवाईत आडथळा आणला नाही. सर्वे नंबर २७३ व २७५ या दोन्ही सरकारी भूखंडावर समोरासमारे असलेल्या युपी, बिहारी रहिवाश्यांच्या चाळी चोख व कडक पोलिस बंदोबस्तात सोमवारी तोडण्यात आल्या.
       या दोन्ही भूखंडावरील ३९ चाळी तोडण्यासाठी सहा जेसीबी, एक पोखलन मशीनचा वापर करण्यात आला. या एका चाळीत सुमारे ३० ते ३५ घरे होती. यानुसार एक हजार ५०० खोल्या पोलिस व एसआरपीच्या कडक बांदोबस्तात तोडण्यात आल्या. सुमारे ३५० पोलिस अधिकाऱ्यांचे मनुष्यबळ यावेळी तैनात करण्यात आले होते. यामध्ये डीसीपी सुभाष बोरसे यांच्यासह एसीपी, पीएसआय, आदी पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस व महिला पोलिस यावेळी मोठ्याप्रमाणात तैनात करण्यात आल्या होत्या.


       महिलांकडून होत असलेल्या विरोधात तोंड देण्यासाठी महिला पोलिसांची भूमिका मात्र निर्णाय ठरली. जिल्हा प्रशासन व ठाणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचाºयांचे देखील मनुष्यबळ यावेळी तैनात होते. यामध्ये उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, तहसीलदार अधिक पाटील, नायबतहसीलदार दिनेश पैठणकर , मंडल अधिकारी प्रशांत कापडे आदींसह महसूल विभागाचे चार नायबतहसीलदार, सहा मंडल अधिकारी, ५० तलाठी आदी महसूलचे मनुष्यबळ यावेळी तैनात होते. याशिवाय एक अ‍ॅम्ब्युलन्स, अग्निशमनदलाचा एक बंब आदी यावेळी घटनास्थळी उपस्थित होते. गेल्या काही वर्षांमधील व या नव्या वर्षातील अतिक्रमण तोडण्याची कदाचित ही सर्वात मोठी व धडक कारवाई जिल्हा प्रशासनाकडून केली जाणार आहे. एका चाळीत ३० ते ३५ घरे दाटीवटीने बांधण्यात आली आहेत. या घरांच्या ३९ चाळींवर हा हातोडा पडला आहे. २०१० नंतरच्या रहिवाश्याी चाळी असल्यामुळे या रहिवश्यांचे पुनर्वसन करता येणार नसल्याचेही प्रशासनाकडून सांगितल जात आहे. या जमिनीवर अतिक्रमण करून चाळींचे बांधकाम करणाºयां विकासकांवर कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाश्यांकडून केली जात आहे. या ३९ चाळी तोडल्यानंतर काही दिवसांनी येथील अन्यही उर्वरित चाळींवर लवकरच कारवाई होण्याचे संकेत मिळत आहे. या कारवाईच्या वेळी भूमाफिये महिलांना पुढे करून विरोध करण्याची शक्यता आहे. या वेळी होणारा कडवा विरोध हाणून पाडण्यासाठी पोलिस बळ सतर्क ठेवण्याचे नियोजन केले आहे. यासाठी जिल्हा पातळीवर बैठकां घेऊन या सर्वात मोठ्या धडक कारवाईचे नियोजन केले आहे. चोख व कडक बंदोबस्तात या चाळींचे अतिक्रमण जमिनदोस्त केले जाणार आहे.

Web Title: Thane district administration raids two houses in Diu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.