रात्र निवा-यांना पुन्हा नकारघंटा, नौपाड्यापाठोपाठ कोपरीतही विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 06:42 IST2017-11-29T06:42:39+5:302017-11-29T06:42:46+5:30

दूरवरून येणा-या नागरिकांसाठी स्टेशन परिसरात रात्र निवारे उभारण्यात यावे, असे असतांनादेखील आपली कातडी वाचविण्यासाठी ठाणेमहापालिकेच्या काही अधिका-यांनी नौपाड्यातील भरवस्तीत ते उभारण्याचा घाट रचल्याचे उघड झाले

 Rejecting night renegotiations, protesting against the poster and posterior | रात्र निवा-यांना पुन्हा नकारघंटा, नौपाड्यापाठोपाठ कोपरीतही विरोध

रात्र निवा-यांना पुन्हा नकारघंटा, नौपाड्यापाठोपाठ कोपरीतही विरोध

ठाणे : दूरवरून येणा-या नागरिकांसाठी स्टेशन परिसरात रात्र निवारे उभारण्यात यावे, असे असतांनादेखील आपली कातडी वाचविण्यासाठी ठाणेमहापालिकेच्या काही अधिका-यांनी नौपाड्यातील भरवस्तीत ते उभारण्याचा घाट रचल्याचे उघड झाले असतांनाच आता कोपरीतील प्रस्तावित रात्र निवा-यालाही स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. आमच्या भागात भिकारी, गुर्दुले नकोत असे सांगून तेथील नगरसेवकांनी नकारघंटा वाजविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सध्या सुरू केलेल्या रात्र निवाºयांचे कामही अर्धवट राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नौपाड्यातही स्थानिकांनी याला विरोध केला होता.
सर्वोच्च न्यायालयाने बेघरांसाठी रात्र निवारे उभारण्याचे आदेश पालिकांना दिले आहेत. परंतु, दिलेल्या निर्धारीत वेळेत ठाणे महापालिकेला ते उभारण्यात यश आलेले नाही.
केंद्र सरकारचे दोन कोटी अनुदान आणि पालिकेचे ९४ लाखांंच्या निधीतून कोपरी येथे रात्र निवारा उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, त्याला आणखी काही महिने लागणार आहेत. या मुद्यावर न्यायालयात पालिकेची कोंडी होणार असल्याने घाईगडबडीत नौपाड्यातील सोनी पथावर असलेल्या पालिकेच्या इमारतीत तो उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु, या निर्णयाविरोधातील पडसाद नुकत्याच झालेल्या महासभेत उमटले होते. त्यामुळे पालिकेचा हा प्रयत्न फसण्याची शक्यता आहे.
नौपाड्यात भाजपाच्या नगरसेवकांनी विरोध केल्याने आता पालिकेला पुन्हा कोपरीतील जागेत हे निवारे उभारण्याचे काम वेगाने करावे लागणार आहे. परंतु, कोपरीतही शिवसेनेच्या काही नगरसेवकांनीही या रात्र निवारा केंद्राला विरोध दर्शविला आहे. आमच्या भागात भिकारी, गुर्दुले नकोत म्हणून त्यांनी नकार घंटा वाजविली आहे.
कोपरीतील एका शिवसेनेच्या नगरसेविकेने याच मुद्यावरून
मंगळवारी पालिकेत एका उपायुक्ताच्या दालनात हुज्जत घातल्याचे दिसून आले आहे. या निवाºयांना कोपरीत नको तर दुसरीकडे कुठेही जागा द्या. त्यांच्यासाठी हवे तर आम्ही कपडे, जेवणाची सोय करतो. परंतु, आमच्या कोपरीत हे भिकारी नकोत अशी थट्टाच या नगरसेविकेने केली आहे.

आयुक्तांशी पंगा कोण घेणार?

याबाबत ही नगरसेविका थेट आयुक्तांना देखील पुढील दोन दिवसात निवेदन देणार असल्याचे समजते. केवळ याच नगरसेविकेचा विरोध नसून इतर काही नगरसेवकांनीदेखील याला विरोध केला आहे.

परंतु, आयुक्तांशी पंगा घेणार कोण म्हणून काहींनी दबक्या आवाजात याला विरोध केला आहे. त्यामुळे आता रात्र निवारा केंद्राचे भवितव्यच अधांतरी दिसत आहे.

Web Title:  Rejecting night renegotiations, protesting against the poster and posterior