शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

मनसेला पाठिंब्याबाबत काँग्रेसची हाताची घडी तोंडावर बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 00:37 IST

वरिष्ठ नेत्यांचा नकार । स्थानिक नेते संभ्रमात

ठाणे : ठाणे शहर मतदारसंघातून राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेऊन थेट महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, काँग्रेसने तूर्तास तरी याबाबत हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवले आहे.लोकसभा निवडणुकीदरम्यान मीरा-भार्इंदर मतदारसंघ काँग्रेसला आणि त्याबदल्यात ठाणे शहर राष्टÑवादीला असे वरिष्ठ पातळीवर ठरले होते. ठाणे मतदारसंघात राष्टÑवादीकडून दोन ते तीन इच्छुकांची नावे पुढे होती. तर, काँग्रेसकडून ११ ते १२ नावे पुढे आली होती. त्यामुळे हा मतदारसंघ राष्टÑवादीकडे जाऊ नये, यासाठी काँग्रेसच्या इच्छुकांनी एकत्र येऊन हा मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवण्याची आग्रही मागणी वरिष्ठांकडे केली होती. मात्र, तरीसुद्धा तो काँग्रेसने राष्टÑवादीला सोडून दिलेला शब्द पाळला. परंतु, राष्टÑवादीने मतदारसंघ मिळूनही ऐनवेळी माघार घेऊन मनसेला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. पाठिंब्यामुळे आघाडीतील राष्टÑवादीचा मित्रपक्ष काँग्रेसने मनसेला पाठिंबा द्यावा, यासाठी राष्टÑवादी आणि मनसेकडून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडे प्रयत्नही झाले. परंतु, काँग्रेसमधील इतर भाषिक नेत्यांमुळे मनसेला पाठिंबा द्यावा की देऊ नये, यासाठी राष्टÑीय पातळीवर विचारणा झाल्यावर राष्टÑीय पातळीवरील नेते मनसेला मदत करण्यास नकार देत आल्याचे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले.अन्य भाषिक नेत्यांची काळजीकाँग्रेसने मनसेला पाठिंबा दर्शवला, तर पक्षातील इतर भाषिक नेते दुखावतील, या भीतीमुळे जाहीररीत्या पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसच्या राष्टÑीय पातळीवरील नेत्यांनी नकार स्पष्ट दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. इत:पर स्थानिक पातळीवरील काँग्रेस नेते प्रत्यक्ष निवडणुकीत काय भूमिका घेतात, मनसेच्या उमेदवाराचा छुपा प्रचार करतात की छुपा प्रचार करत असल्याचे मनसेला केवळ भासवून, प्रत्यक्षात विरोधकांशी हातमिळवणी करतात, अशा प्रश्नांची उत्तरे मतमोजणीनंतरच मिळू शकणार आहेत.

टॅग्स :thane-acठाणे शहरMNSमनसेcongressकाँग्रेस