शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
5
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
6
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
7
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
10
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
11
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
12
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
13
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
14
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
15
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
16
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
17
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
18
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
19
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
20
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत

पाणीटंचाई निवारणासाठी पक्षभेद विसरून एकत्र या, आव्हाडांची पालकमंत्र्यांसह आमदारांना साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 01:13 IST

ठाण्यातील वाढती पाणीटंचाई लक्षात भविष्यात ठाणेकरांचे आणखी हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठाणे - ठाण्यातील वाढती पाणीटंचाई लक्षात भविष्यात ठाणेकरांचे आणखी हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पक्षभिनिवेश बाजूला सारून ठाण्यासाठी मंजूर झालेले शाई धरण मार्गी लावूया अशी साद राष्टÑवादीचे कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाण्यातील इतर तिन्ही आमदारांना घातली आहे. त्यामुळे आता किती आमदार त्यांच्या या हाकेला ओ देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.या संदर्भात त्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, संजय केळकर आणि सुभाष भोईर यांना एक पत्र लिहिले असून त्याच्या माध्यमातून ही साद घातली आहे. ठाण्यात पाण्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. हिरानंदानी मेडोजसारख्या सर्वात महागड्या गृहसंकुलांनासुद्धा टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आज घोडबंदरचा पट्टा हा पाण्यावाचून त्रस्त आहे. जी परिस्थिती घोडबंदरला आहे तीच परिस्थिती दिवा, कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट या परिसरामध्ये आहे. काही ठिकाणी ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमधून थेट पाणीजोडणी घेऊन दादागिरी करून काही विभागामध्ये पाणी दिले जाते. परंतु, या सगळ्याचा परिणाम हा पाणीवितरणावर होतो आणि अख्ख्या ठाणेकरांना त्याचे भोग भोगावे लागत आहेत.पाणीवितरणात ३५ वर्षांत महापालिकेने काहीच केले नाहीगेल्या २५ ते ३० वर्षांमध्ये पाणीवितरणाबाबत धाडसाने महानगरपालिकेने काम केले असे काहीच दिसत नाही. पण, त्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपले स्वतंत्र स्त्रोत्र नसल्यामुळे एमआयडीसीमध्ये होणारे शटडाऊन आणि स्टेमचा होणारा शटडाऊन यामुळे अनेकवेळा ४-४ दिवस विविध भागांमध्ये पाणी नसल्याचे आढळून आले आहे. खरतर आतापर्यंत आपण आपले स्वत:च स्त्रोत्र म्हणजेच एक धरण उभे करायला हवे होते. पण, दुर्देवाने ते घडू शकले नसल्याची खंतही त्यांनी यात व्यक्त केली आहे. परंतु, यामध्ये आता कुठल्या पक्षाला दोष मात्र त्यांनी दिलेला नाही. सध्याची ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज ही परिस्थिती पाहता आणि गेल्या ५ वर्षांचा अनुभव पाहता पावसाळाही हळूहळू पुढे सरकत चालला आहे. पूर्वी जूनच्या ७ तारखेला येणारा पाऊस आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरूहोत आहे. उन्हाळा जो पहिला एप्रिल मध्ये सुरु व्हायचा तो आता फेब्रुवारी-मार्च मध्ये सुरू होतो. त्यामुळे पाऊसही कमी पडत आहे. त्यामुळे येणाºया काळात आपल्याला अधिक पाणीतुटवड्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आपले स्वतंत्र धरण असणे फार गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिका आणि शासनाची मदत घेऊन जे शाई धरण २००३ साली मंजूर केले होते. त्या धरणाबाबत अंतिम भूमिका घेऊन त्याच्या बांधकामाला सुरुवात करूया अशी साद त्यांनी या पत्राच्या माध्यमातून घातली आहे. राजकारण बाजूला ठेवूयात आणि आपल्या ठाण्याचा पाणी प्रश्न हा कायमचा सोडवूया, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेwater scarcityपाणी टंचाई