शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

हॉटेल, बार यांना अग्निशमन दलाच्या नाहरकत दाखल्यासाठी मुदतवाढ देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करा - मनविसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 16:18 IST

हॉटेल, बार यांना अग्निशमन दलाच्या नाहरकत दाखल्यासाठी मुदतवाढ देण्याच्या निर्णयाचा महापालिका आयुक्तांनी फेरविचार करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे.

ठळक मुद्देसर्वसामान्य ठाणेकरांचे हित जपावे - मनविसेहुक्का पार्लर विरोधात मनसे पध्दतीने तीव्र आंदोलन उभारेल - संदीप पाचंगे१५ दिवसांत कोणतीही दुर्घटना झाल्यास त्याचे पालकत्व पालकमंत्री स्वीकारतील का? - मनविसे

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: शहरातील ४५८ हॉटेल्स, लाँज, बार व तत्सम ऐषोआरामी सुविधा पुरविणाºया आस्थापनांचा ठाणेकºयांच्या जीवाशी खेळ सुरू असतानाही अवघ्या काही तासांतच अग्निसुरक्षेच्या दाखल्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ महापालिकेने दिली आहे. तसेच, या मुदतवाढीत दुर्घटना घडून जिवीत अथवा वित्तहानी झाल्यास याला सर्वस्वी आयुक्त जबाबदारी असतील त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करून त्यांनी सर्वसामान्य ठाणेकरांचे हित जपावे अशी मागणी मनविसेने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील दुर्दैवी दुर्घटनेत अनेकांचा बळी गेल्यानंतर तेथील प्रशासनाला खडबडून जाग आली. त्यानंतर सर्वच ठिकाणच्या अग्नी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला ठाणे महापालिकेनेही काही महत्त्वाची पाऊले उचलल्याचे दिसत असुन मनपा आयुक्त म्हणून त्यांनी कारवाईचा आव देखील आणल्याचे वाचनात आले असा आरोप मनविसेचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला आहे. मुंबईत घडलेल्या दुर्घटनेआधी मनसेच्या तेथील पदाधिकाºयांनी प्रशासनाला सुचिवले होते. त्याचप्रमाणे ठाण्यात कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून आयुक्तांनी याचा गांभीर्याने विचार करावा व निर्भीडपणे संबंधितांवर कठोर कारवाई करावी. मुंबईच्या आयुक्तांना राजकीय नेत्यांकडून दबाव येत आहे असे त्यांनी सांगितले तसा दबाव ठाण्यातून आयुक्तांवर आला की काय ज्यामुळे डॅशिंग, आक्र मक प्रतिमा असलेले आमचे आयुक्त नरमले, रिक्षाचालकांची अवैध पार्किंग करणारºयांची कॉलर पकडण्याची हिंमत दाखवलीत तशीच धनदांगडयांविरूध्द कारवाई करताना दाखवावीत हि अपेक्षा. सर्वसामान्य ठाणेकरांना तुम्हाला माघार घेताना पहाण्याची सवय नाही असा टोलाही पाचंगे यांनी हाणला आहे. ठाणे शहराच्या प्रथम नागरिक (महापौर) तुम्हाला हुक्का पार्लरवर तसेच अनधिकृत हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश देऊनही आपण कोणाच्या दबावाने कारवाई करण्याचे थांबविले आहे. येत्या १५ दिवसांत कोणतीही दुर्घटना झाल्यास त्याचे पालकत्व पालकमंत्री स्वीकारतील का? असा सवाल करीत अग्निशमन दलाचा ज्यांच्याकडे दाखला नाही अशा हॉटेल व्यावसायिकांना जोपर्यंत नाहरकत दाखला मिळत नाही तोपर्यंत फक्त पदार्थ शिजवून पार्सल देण्याची मुभा द्यावी असे मनविसेने सुचित केले आहे. मुंबईतील दुर्घटनेच्या हुक्का हेच मुख्य कारण होते. हुक्का पार्लर मुळे कॉलेजचे विद्यार्थी त्यांच्या आयुष्याची वाट लावून घेत आहेत. आपण ८ दिवसांत सर्व हुक्का पार्लर वर बंदी आणावी अन्यथा महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेना हुक्का पार्लर विरोधात मनसे पध्दतीने तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा पाचंगे यांनी दिला आहे. हुक्का पार्लर व मनसे कार्यकर्ते यांच्यात होणाºया संघर्षास सर्वतोपरी आपण जबाबदार असाल असेही ते आपल्या निवेदनात शेवटी म्हणाले आहेत. यावेळी किरण पाटील, प्रमोद पत्ताडे, संदिप चव्हाण, प्रसाद होडे, पंकज कोळसकर, संदीप शेळके  उपस्थित होते.

 

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेMumbaiमुंबई