'Govt conflicts with MNVS': 'ICTM' exams at Nashik ITI; 95 percent students disapprove | ‘मनविसे’कडून घेराव : नाशिक आयटीआय येथे ‘आयसीटीएसएम’ परिक्षेत गोंधळा; ९५ टक्के विद्यार्थी नापास

ठळक मुद्दे९५ टक्के विद्यार्थी नापास १ महिन्याच्या आत सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा नव्याने परीक्षा

नाशिक : आयसीटीएसएमच्या लेखी व गणित विषयाच्या पेपरला ऐनवेळी बदल करुन दोन दिवस पुढे ढकलण्यात आला. कुठलीही सुचना न देता परीक्षा ऐनवेळी घेतली गेली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होऊन सुमारे ९५ टक्के विद्यार्थी नापास झाले. याप्रकरणी प्रशासन दोषी असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानास कारणीभूत असल्याचा आरोप ‘मनविसे’कडून करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आयटीआय उपसंचालक सुर्यवंशी यांना जाब विचारण्यात आला. यावेळी विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या दालनात ठिय्या देऊन घेराव घातला. परीक्षा ओएमआर पध्दतीने पुन्हा विनामुल्य घेतली जावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. आय.सी.टी.एस.एम.व्यवसायाच्या परीक्षेत झालेला गोंधळा बाबत मनविसे पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानी बाबत निर्दशनास आणून दिले. यावेळी उपसंचालक सूर्यवंशी यांनी सदर बाबीची  दखल घेत, १ महिन्याच्या आत सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा नव्याने परीक्षा घेण्यात येईल तसेच परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना  ८ दिवस प्रशिक्षण देऊन नंतर परीक्षा घेण्यात येईल व या परीक्षेसाठी लागणारी फी संदर्भात वरिष्ठ अधिका-र्यांशी चर्चा करून ती कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, मनविसे जिल्हाध्यक्ष दिपक चव्हाण ,जिल्हा सरचिटणीस शशी चौधरी, जिल्हा सरचिटणीस गणेश मंडलिक, एजाज शेख, सौरभ सोनवणे , नितीन धानापुने, सागर निगळ आदि पदाधिकारी उपस्थित होते .