बदलीच्या नावाखाली शिक्षिकेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 00:16 IST2020-09-29T00:15:54+5:302020-09-29T00:16:33+5:30

गुन्हा दाखल : शिक्षकाला पोलीस कोठडी

Rape of a teacher in the name of transfer in thane | बदलीच्या नावाखाली शिक्षिकेवर बलात्कार

बदलीच्या नावाखाली शिक्षिकेवर बलात्कार

जव्हार : बोईसर येथील ३२ वर्षीय शिक्षिकेची मोखाड्यातील गोंदे आश्रमशाळेत आॅगस्ट २०१९ ला बदली झाली होती. बोईसर येथून सेवेसाठी ये-जा करण्यात कौटुंबिक अडचणी येत होत्या. या संधीचा फायदा घेत येथील शिक्षक मिलिंद सुरेश भांगरे याने बदलीचे आमिष दाखवून या शिक्षिकेस मोखाड्यात मित्राच्या खोलीवर नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित शिक्षिकेच्या तक्रारीवरून आरोपी मिलिंद भांगरे यास मोखाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यास जव्हारच्या प्रथम वर्ग न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना मोखाड्यात घडली आहे. गोंदे येथील आश्रमशाळेत कार्यरत असलेल्या पीडित शिक्षिकेला बोईसर येथून ये-जा करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे रोजच्या अपडाउनला कंटाळलेली सदर शिक्षिका बदलीसाठी प्रयत्न करत होती. याच संधीचा फायदा घेत येथील शिक्षक मिलिंद भांगरे याने या पीडित शिक्षिकेस बदली करून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी मोखाड्यात आणून आपल्या मित्राच्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिच्या बोटातील दोन तोळ्यांची अंगठी काढून घेतली. या घटनेची वाच्यता केल्यास तिच्यासह कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित शिक्षिकेने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर, या शिक्षिकेने मोखाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून बलात्कारी शिक्षक मिलिंद सुरेश भांगरे यास मोखाडा पोलिसांनी बळजबरीने बलात्कार, खुनाची धमकी असा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास मोखाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय आंबरे हे करीत आहेत.

Web Title: Rape of a teacher in the name of transfer in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.