हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचा मोर्चा; ठाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं लावला बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 11:52 IST2025-06-28T11:51:21+5:302025-06-28T11:52:10+5:30

शरद पवार गटाचे पदाधिकारी प्रकाश पाटील यांच्यावतीने  कळवातील विविध भागात लावण्यात आलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Raj and Uddhav Thackeray brothers march against Hindi compulsion; Sharad Pawar's NCP puts up banner in Thane | हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचा मोर्चा; ठाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं लावला बॅनर

हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचा मोर्चा; ठाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं लावला बॅनर

ठाणे : मराठी भाषा सक्तीच्या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी येत्या पाच जुलैला मोर्चाची हाक दिली आहे. याला उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. असे असताना ठाण्यात शरद पवार गटाने देखील या मोर्चाला पाठिंबा दिल्याचे फलक झळकावले आहेत.  या फलकावर मराठी अस्मिता जागृत करूया ठाकरेच्या नेतृत्वात मोर्चा सामील होऊया! ठाकरेंचा मोर्चा राष्ट्रवादीचा पाठिंबा! असा उल्लेख करण्यात आला आहे. 

शरद पवार गटाचे पदाधिकारी प्रकाश पाटील यांच्यावतीने  कळवातील विविध भागात लावण्यात आलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्रात शालेय अभ्यास क्रमात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. या अनुषंगाने त्यांनी येत्या ५ जुलै रोजी मुंबईला गिरगाव चौपाटी येथून एका मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला उद्धव सेनेने सुद्धा आपला पाठिंबा दर्शवला आहे.  दोन्ही ठाकरे बंधू मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला शरद पवार गटाने देखील पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांचा पक्ष देखील या मोर्चात सामील होणार आहे.

यानंतर ठाण्यामध्ये शनिवारी सकाळीच त्यानिमित्ताने बॅनरबाजी पाहायला मिळाली. शरद पवार गटाचे ठाणे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या वतीने ठाण्यातील, कळवा नाका, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, स्टेशन रोड आदी परिसरात  बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर राज ठाकरे उद्धव ठाकरे सह शरद पवारांचे छायाचित्र  आहे. या बॅनरवर चला मुंबई,मराठी अस्मिता जागृत करूया ठाकरेच्या नेतृत्वात मोर्चा सामील होऊया! मराठी भाषेच्या अभिमानासाठी  ठाकरेंचा मोर्चा राष्ट्रवादीचा पाठिंबा! शरद पवार साहेबांच्या विचाराचा मान! जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी  मैदानात! एक श्वास मराठीचा ध्यास! मराठीसाठी आम्ही एकत्र आलोय आता आवाज उठवायचा असा देखील मजकूर लिहिला आहे.

Web Title: Raj and Uddhav Thackeray brothers march against Hindi compulsion; Sharad Pawar's NCP puts up banner in Thane