ठाण्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी, पालघरलाही पावसाने झोडपले  

By अजित मांडके | Updated: May 6, 2025 22:01 IST2025-05-06T22:01:07+5:302025-05-06T22:01:28+5:30

Thane Rain News: उकाड्याने हेराण झालेल्या ठाणेकरांना मंगळवारी रात्री अवकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा चांगलाच तडका बसला. रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास वाऱ्याला सुरवात झाली. त्यानंतर शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा खंडित झाला आणि पावसाला सुरवात झाली.

Rain showers with strong winds in Thane, rain also lashed Palghar | ठाण्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी, पालघरलाही पावसाने झोडपले  

ठाण्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी, पालघरलाही पावसाने झोडपले  

- अजित मांडके 
ठाणे - उकाड्याने हेराण झालेल्या ठाणेकरांना मंगळवारी रात्री अवकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा चांगलाच तडका बसला. रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास वाऱ्याला सुरवात झाली. त्यानंतर शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा खंडित झाला आणि पावसाला सुरवात झाली.

मंगळवारी दिवसभर वातावरणात उकाडा जाणवत होता. मात्र रात्री 8 नंतर वातरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. त्यानंतर रात्री ९ वाजताच्या सुमारास जोरदार वाऱ्याला सुरवात झाली. त्यानंतर पावसाच्या सरी सुद्धा बरसण्यास सुरवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे कामावरून घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. तर या पावसामुळे शहरातील घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट, वाघबीळ, आनंद नगर, मानपाडा आदींसह शहरातील इतर भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. तसेच वाऱ्यामुळे शहरातील काही भागात वृक्ष पडल्याच्या घटना घडल्या. अवघ्या ५ ते १० मिनिटे विजांचा कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावल्याने वातरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता.

पालघरलाही मुसळधार पावसाने झोडपले
पालघर जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास वादळी वाऱ्याला सुरुवात झाली आहे. विजांसह पावसालाही सुरुवात झाली, तर जव्हार तालुक्यात साडेआठच्या  सुमारास मोठ्या प्रमाणावर विजा, वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी. जव्हार गंजाड मार्गावरील वीजवाहिनी बंद पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला.

Web Title: Rain showers with strong winds in Thane, rain also lashed Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.