शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

डाळी, कडधान्यांना महागाईची फोडणी; रोगप्रतिकारशक्तीसाठी वाढती मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 12:27 AM

किरकोळ बाजारात दर वाढले, प्रथिनयुक्त पदार्थांवर भर

- स्रेहा पावसकर ठाणे : घाऊक बाजारात डाळी, कडधान्ये यांचे भाव स्थिर असतानाही किरकोळ बाजारपेठेत मात्र छोट्या व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनदरम्यान झालेली आपली तूट भरून काढण्यासाठी डाळी, कडधान्यांच्या दरांत वाढ केली आहे. लॉकडाऊनपूर्वीच्या डाळी, कडधान्यांचे दर पाहता आताच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे.कोरोनामुळे सर्वच व्यापार, उद्योग, नोकरीधंद्यांची गणिते बदलून गेली आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून बाजारपेठा, दुकानेही बंद होती. आता अनलॉक केल्यावर काही प्रमाणात दुकाने सुरू झाली. मात्र, अन्नधान्याच्या सगळ्याच वस्तूंचे दर वाढलेले दिसत आहेत. मुळात या कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विविध कॅल्शिअम, प्रथिनयुक्त पदार्थ खाण्यावर भर दिला जात आहे. तसेच श्रावणात अनेकजण मांसाहार करीत नाही. त्यातच, पालेभाज्यांचे भावही कडाडले आहेत. या सर्वच कारणांनी गेल्या काही दिवसांत डाळी, कडधान्ये अधिक प्रमाणात खाल्ली जात आहेत. किरकोळ बाजारातील याची मागणी पाहता डाळी, कडधान्यांच्या दरात वाढ झाली आहे. सर्वच कडधान्ये शरीराला पोषक असतात. ती शरीराला हानी पोहोचवत नाहीत. त्याने पचनशक्ती सुधारते. तसेच ती लवकर खराब होत नाहीत, यामुळे कोरोनाच्या दरम्यान आणि येत्या काळातही कडधान्य, डाळींना मागणी राहणार आहे.डाळी आधीचे दर आताचे दरकडधान्य (प्र.कि) (प्र.कि)तूरडाळ ९० ११०मूगडाळ ११० १२५चणाडाळ ६० ८०हि. वाटाणा १४० १६०स. वाटाणा ९० १००चणा ६५ ८०चवळी १०० १२०काबुली चणा ९० १००मटकी ११० १२५राजमा १०० १००कोरोनाच्या दरम्यान सर्वच वस्तूंची टंचाई निर्माण झाली होती. मालवाहतूकही बंद असल्याने बाजारात आवक कमी होती आणि मागणी वाढली होती. त्यामुळे सर्वच वस्तूंचे दर वाढत असताना धान्य, डाळी, कडधान्यांचे भावही थोडे वाढले होते. त्यातच अनेक महिने व्यापाऱ्यांची दुकानेही बंद होती. त्यांनाही प्रचंड नुकसान सहन करावे लागले होते. आता अनलॉकमध्ये काही प्रमाणात दुकाने उघडली आहेत. किरकोळ बाजारात धान्य, डाळी, कडधान्यांचे दर मात्र थोडे वाढलेले आहेत. तर, आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाचे दर वाढल्याने आपल्या बाजारातही तेलाच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. - शंकर ठक्कर, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघलॉकडाऊनदरम्यान बाजारात प्रत्येक वस्तूचे दर वाढलेले आहेत. डाळी, कडधान्यांचे दरही थोडे वाढलेले आहेत.- भावेश चौरसिया, व्यापारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या