शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

पोलीस ठाण्यांना आवश्यक सुविधा देणार

By admin | Published: April 21, 2017 12:03 AM

मीरा-भार्इंदरमध्ये सध्या एकूण सहा पोलीस ठाणी कार्यरत आहेत. त्यातील बहुतांश पोलीस ठाण्यात सुविधांचा अभाव आहे. याचा आढावा घेण्यासाठी थेट पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते

राजू काळे , भाईंदरमीरा-भार्इंदरमध्ये सध्या एकूण सहा पोलीस ठाणी कार्यरत आहेत. त्यातील बहुतांश पोलीस ठाण्यात सुविधांचा अभाव आहे. याचा आढावा घेण्यासाठी थेट पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी पोलीस ठाण्यांना भेटी देण्यास सुरूवात केली आहे. त्यावेळी निदर्शनास येणाऱ्या समस्या सोडविणे तसेच आवश्यक सुविधा पालिकेमार्फत पुरविल्या जातील, अशी माहिती आयुक्तांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पोलिसांचे मनोधैर्य वाढविल्यास त्यांचे कार्यही तितकेच चांगले होते. त्यात एखादा कर्मचारी वा अधिकाऱ्याचा उर्मटपणा इतर पोलिसांच्या कार्यात विघ्न आणण्यास जबाबदार ठरतो. तरी देखील पोलीस आपल्या कर्तव्यात कसूर करीत नाही. कधीकधी पोलीस ठाण्यातील सुविधांअभावी पोलिसांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. चांगल्या सुविधा त्यांना मिळाल्यास त्यांची कार्यतत्परता वाढते. या अनुषंगाने राज्याच्या गृहविभागासह मीरा-भार्इंदर महापालिकेकडून स्थानिक पोलीस ठाणे व वाहतूक शाखेला साहित्यांचा पुरवठा केला जातो. प्रसंगी वाहतूक शाखेला मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने सुमारे ५० वाहतूक मदतनीसही पालिकेने दिले आहेत. नो पार्कींग झोनमधील चारचाकी वाहनांवर कारवाईसाठी आवश्यक साहित्यांसह शहरातील गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तजवीज, ध्वनी प्रदूषण यंत्रे आदी साहित्यही पोलिसांच्या दिमतीला पालिकेकडून पुरविली जातात, असेही गीते यांनी सांगितले. स्थानिक पोलीस ठाण्यांना अत्याधुनिक लूक देण्यासाठी अद्याप गृहविभागाकडून हालचाल झाली नसली तरी त्याचे प्रयत्न मात्र नक्कीच केले जात असल्याचे सतत सांगितले जात आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस ठाणी पालिकेच्या मदतीच्या अपेक्षेवर असली तरी त्यासाठी राज्य सरकारकडूनही पालिकेला वेळोवेळी निर्देश दिले जात आहेत. अनेक वर्षापासून पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न रेंगाळला आहे. त्यासाठी मीरा रोड येथील भूखंड पोलिसांच्या हाती लागला नसला तरी पालिकेने आयुक्तालयासाठी पुरेशी जागा देण्याची प्रक्रीया सुरु केली आहे, असेही ते म्हणाले.