गलवानमधील भ्याड हल्ल्याचा निषेध, चीनच्या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती जाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 14:58 IST2020-06-18T14:58:07+5:302020-06-18T14:58:49+5:30
डोंबिवलीतील भाजपा कार्यकर्त्यांनी सर्वप्रथ वीरगती प्राप्त झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली. “ह्या आव्हानात्मक प्रसंगी सर्व भारतीय तरुण, भारत सरकार आणि भारतीय जवानांसोबत आहेत.

गलवानमधील भ्याड हल्ल्याचा निषेध, चीनच्या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती जाळली
डोंबिवली : लडाखमधील गलवान व्हॅली येथे चीन सैन्याने भारतीय जवानांवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे. चीनच्या या कृत्याचा निषेध नोंदवत देशातील नागरिक चीनी मालावर बहिष्कार घालण्याचं आवाहन करत असून अनेक ठिकाणी चीनी मालाची होळी करण्यात आली आहे. आज डोंबिवलीत भाजप युवामोर्चातर्फे चीनचा निषेध नोंदविण्यात आला. डोंबिवली पूर्व मंडलच्या भाजयुमोने चीनचा प्रतिकात्मक राष्ट्रध्वज जाळून आपला निषेध व्यक्त केला.
डोंबिवलीतील भाजपा कार्यकर्त्यांनी सर्वप्रथ वीरगती प्राप्त झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली. “ह्या आव्हानात्मक प्रसंगी सर्व भारतीय तरुण, भारत सरकार आणि भारतीय जवानांसोबत आहेत.” शहीद जवानांच्या कुटुंबासोबत आमच्या संवेदना आहेत. चीन असो वा पाकिस्तान, घुसखोरी आणि दहशतवाद ह्याबद्दल आपले ‘झिरो टॉलरन्स’ हेच धोरण असले पाहिजे अशी भावना, यावेळी भाजयुमो पूर्व मंडल अध्यक्ष मिहीर देसाई यांच्यासह उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी कार्यालयमंत्री सौरभ ताम्हणकर, अथर्व ताडफळे, मंदार जोशी, रोहन देसाई, राजा सिंघानी, श्रेयस मानकामे, चिन्मय कामतेकर, भूषण देव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.