सत्तारांविरुद्ध उल्हासनगरात राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा, कार्यकर्त्यांची धरपकड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 22:59 IST2022-11-07T22:58:18+5:302022-11-07T22:59:05+5:30

उल्हासनगर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पंचम कलानी यांनी पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबत मंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द काढल्याचा निषेध केला.

Protest march of NCP in Ulhasnagar, activists held by police | सत्तारांविरुद्ध उल्हासनगरात राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा, कार्यकर्त्यांची धरपकड

सत्तारांविरुद्ध उल्हासनगरात राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा, कार्यकर्त्यांची धरपकड

सदानंद नाईक

उल्हासनगर : मंत्री अब्दुल सत्तार यांनी काढलेल्या अपशब्दच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने नेहरू चौकात निषेध मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह राज्य शासना विरोधात घोषणाबाजी केली असून पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. 

उल्हासनगर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पंचम कलानी यांनी पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबत मंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द काढल्याचा निषेध केला. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नेहरू चौकात सोमवारी सायंकाळी ८ वाजता निषेध मोर्चा काढून मंत्री सत्तार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करून अश्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून हाकलून देण्याची मागणी केली. उल्हासनगर पोलिसांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करून उशिरा वैयक्तिक जामिनावर सुटका करण्यात आली. पक्षाचे मनोज लासी, कमलेश निकम, नारायण पंजाबी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी आक्रमक झाले होते.

Web Title: Protest march of NCP in Ulhasnagar, activists held by police