बीअर पिण्यास विरोध केल्याने तरुणावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:05 IST2019-05-03T01:05:37+5:302019-05-03T01:05:46+5:30

सार्वजनिक ठिकाणी बीअर पिण्यास विरोध केल्याने संतापलेल्या त्रिकुटाने रोहित सावंत या तरु णावर हॉकीस्टिक आणि तलवारीने हल्ला केल्याची घटना टिटवाळानजीकच्या गाळेगाव येथे मंगळवारी रात्री घडली

The protest against the youth by attacking the beer | बीअर पिण्यास विरोध केल्याने तरुणावर हल्ला

बीअर पिण्यास विरोध केल्याने तरुणावर हल्ला

टिटवाळा : सार्वजनिक ठिकाणी बीअर पिण्यास विरोध केल्याने संतापलेल्या त्रिकुटाने रोहित सावंत या तरु णावर हॉकीस्टिक आणि तलवारीने हल्ला केल्याची घटना टिटवाळानजीकच्या गाळेगाव येथे मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात रोहित जाधव, आदेश जाधव, भावशा या त्रिकुटाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

गाळेगाव परिसरात राहणारा रोहित हा मंगळवारी याच परिसरातील एका गॅॅरेजसमोरून जात होता. त्यावेळी गॅरेजनजीकच्या झाडाजवळ रोहित जाधव, आदेश जाधव व भावशा हे बीअर पित असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याने त्रिकुटाला अशा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्याास मनाई केली. त्यामुळे त्यांच्या वाद झाला. यातून संतापलेल्या त्रिकुटाने रोहितला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यात त्यांनी हॉकीस्टिक व तलवारीने रोहितवर हल्ला केला. त्यात रोहित गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रु ग्णालयात दाखल केले आहे.

याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी तक्रारीच्या आधारे रोहित जाधव, आदेश जाधव व भावशा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती टिटवाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश खोपकर यांनी दिली.

Web Title: The protest against the youth by attacking the beer