शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

नवघरमधील प्रस्तावित दुसऱ्या तरणतलावाचा मार्ग होणार मोकळा; तिसरे तरणतलाव ठरणार दिवा स्वप्नच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 18:04 IST

- राजू काळे  भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या एकमेव क्रिडा संकुलामध्ये साकारण्यात आलेले तरणतलाव नुकतेच सुरु झाले असुन त्याला पर्याय म्हणुन नवघर परिसरात असलेल्या गुरुद्वारा येथील आरक्षण क्रमांक १०९ या नागरी सुविधा भूखंडावर दुसरे नवीन तरणतलाव साकारण्याचा मार्ग येत्या २६ फेब्रुवारीच्या महासभेत मोकळा होणार आहे. त्याच्या आर्थिक व प्रशासकीय प्रस्तावाला मान्यता मिळणार ...

- राजू काळे  भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या एकमेव क्रिडा संकुलामध्ये साकारण्यात आलेले तरणतलाव नुकतेच सुरु झाले असुन त्याला पर्याय म्हणुन नवघर परिसरात असलेल्या गुरुद्वारा येथील आरक्षण क्रमांक १०९ या नागरी सुविधा भूखंडावर दुसरे नवीन तरणतलाव साकारण्याचा मार्ग येत्या २६ फेब्रुवारीच्या महासभेत मोकळा होणार आहे. त्याच्या आर्थिक व प्रशासकीय प्रस्तावाला मान्यता मिळणार असुन गेल्या ७ वर्षांपासुन रेंगाळलेले तिसरे तरणतलाव मात्र अद्याप लटकलेच आहे. 

पालिकेने २०१४ मध्ये बांधलेल्या क्रिडा संकुलात सध्या एकमेव तरणतलाव साकारण्यात आले आहे. या तरणतलावामुळे नागरीकांची सोय झाली असली तरी पालिकेकडुन सुरु होणारे आणखी दोन तरणतलाव लालफितीत अडकले होते. त्यापैकी भार्इंदर पुर्वेकडीलच नवघर परिसरात असलेल्या आरक्षण क्र. १०९ वरील नागरी सुविधा भूखंडावर नवीन तरणतलाव साकारण्याचा प्रस्ताव शिवसेना नगरसेवक दिनेश नलावडे यांनी पालिकेकडे सादर केला होता. त्याचे अंदाजपत्रक बांधकाम विभागाने नुकतेच तयार केले असुन त्याला महासभेची मान्यता आवश्यक ठरणार आहे. प्रशासनाने त्यासाठी चालु अंदाजपत्रकात २ कोटींची तरतुद केली आहे. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असताना त्यावर आयुक्तांची मान्यता महत्वाची ठरली होती. परंतु, त्यात विलंब लागल्याने उशीरा का होईना, हा तरणतलाव साकारण्याचा मार्ग येत्या २६ फेब्रुवारीच्या महासभेत मोकळा होणार आहे. त्याच्या अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार आर्थिक व प्रशासकीय प्रस्तावाला २६ फेब्रुवारीच्या महासभेने मान्यता दिल्यास त्या भूखंडावर दुसरा तरणतलाव साकारला जाणार आहे. हा तरणतलाव नवघर येथील मोठ्या लोकवस्तीत साकारण्यात येणार असल्याने तो तेथील जलतरणपटूंसाठी उपयुक्त ठरणार आहे. तत्पुर्वी दहिसर चेकनाका परिसरात भव्य गृहसंकुल बांधणाय््राा लोढा बिल्डरला पालिकेने २०११-१२ मध्ये बांधकाम परवानगी दिली. त्यापोटी पालिकेला सुमारे ७ हजार चौरस मीटर जागा नागरी सुविधा भुखंडाच्या माध्यमातुन प्राप्त झाली. त्या जागेवर बिल्डरच्याच प्रस्तावानुसार पालिकेने खाजगी शाळा बीओटी तत्वावर सुरु करण्याची परवानगी बिल्डरला दिली. त्यापोटी महिन्याला सुमारे १ लाख २० हजार रुपये भाडे पालिकेला देण्याचे निश्चित करण्यात आले. याविरोधात सेनेचे माजी नगरसेवक प्रशांत पालंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान बिल्डरने पालिकेला नियोजित तरणतलावासाठी नवीन जागा प्रस्तावित केली असुन ती अपुरी तसेच ती तरणतलावासाठी अयोग्य असल्याने पालिकेकडून ती नाकारण्यात आली आहे. यामुळे काशिमिरा, पेणकरपाडा, महाजनवाडी, मीरागाव आदी ठिकाणच्या जलतरणपटूंच्या तिसऱ्या तरणतलावाचे स्वप्न दुभंगले आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक