शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

सूतिकागृहाचा प्रस्ताव दुर्लक्षित?

By admin | Updated: September 15, 2015 23:08 IST

शहरातील मध्यवर्ती भागात टिळकपथावर केडीएमसीच्या सूतिकागृहाची वास्तु आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्या वास्तूला नुतनीकरणाच्या नावाखाली बंद करुन ठेवले आहे.

- अनिकेत घमंडी,  डोंबिवलीशहरातील मध्यवर्ती भागात टिळकपथावर केडीएमसीच्या सूतिकागृहाची वास्तु आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्या वास्तूला नुतनीकरणाच्या नावाखाली बंद करुन ठेवले आहे. आता तर ती पडीक, दुर्लक्षित वास्तू असून ते सूतिकागृह आहे की खंडहर असा प्रश्न निर्माण होत आहे. भटकी कुत्री, उंदीर-घुशींसह, झाडा-झुडपांचा कचरा, यामुळे ती वास्तू बकाल झाली आहे. परिणामी डासांसह अन्य प्रार्दुभावाचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत आहे. महापालिकेने ते एखाद्या ट्रस्टला द्यावे, तोच त्याचे बांधकाम करेल व अद्ययाबत सुपर स्पेशालीस्ट हॉस्पिटल साकारेल, असा प्रस्ताव येथील नगरसेवकाने महापालिकेच्या अधिका-यांना दिला होता. परंतु त्याकडे प्रशासनाने व सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. याच वॉर्डात नेहरु मैदान हे महापालिकेचे खेळाचे एकमेव मैदान आहे. त्या मैदानाचाही विकास करण्यात यावा असा प्रयत्न नगरसेवकाने केला होता, परंतु तोही धुळखात पडला होता. आता कुठे त्या संदर्भातील कागदपत्रे एका टेबलावरुन दुस-या टेबलावर पुढे सरकत आहेत. या व्यतिरीक्त परिसरात मनोरंजनाचे ठिकाण नाही. सुमारे ९ हजार लोकवस्ती असून बहुतांशी रहीवासी हे उच्चभ्रू आहेत. बहुतांशी नागरिकांकडे चारचाकी वाहने आहेत, परंतु इमारती जुन्या प्लॅनिंगच्या असल्याने या ठिकाणची वाहने ही रस्त्यावर उभे आहेत. त्यामुळे आधीच गल्लीबोळातले रस्ते वाहने उभी असल्याने आणखीनच अरुंद होत आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहाचा अभाव असून त्यासाठी जागा नसल्याचे सांगण्यात आले. कचराकुंडी मुक्त वॉर्ड अद्यापही झालेला नाही. नेहरु मैदानातील एका कडेला असलेली कुंडी हटता हटत नसल्याने नगरसेवकाच्या नाकीनऊ आले आहेत. येथिल अंतर्गत रस्त्यांवर केडीएमटी येत नाही. हा भाग स्थानकालगत असल्याने परिवहनाची गरजही नाही. फडके रोडनजीक फेरीवाल्यांचा प्रश्न भेडसावत आहे. याच ठिकाणी विशिष्ट समाजाचीही वस्ती असून त्या ठिकाणी कच-याची समस्या गंभीर आहे. तेथील रहिवासी स्वत:च कचरा रात्रीतच घराबाहेर टाकतात. त्यामुळे तेथे भटकी कुत्री जातात, अनेकदा त्यामुळेही आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. वॉर्डात पाण्याची समस्या नाही. काही अपवाद वगळता कचराही नाही. सूतिकागृहा संदर्भात प्रस्ताव तीन-चार आयुक्तांसमोर ठेवला, पण त्याचे काहीच झाले नाही. रस्ते अरुंद असल्याने आता बाजुला असलेल्य गटारी रस्त्याच्या लेव्हलला आणल्या असून त्या जागेत चारचाकींचे पार्किंग होणार. एकही वाचनालय बंद नाही हे विशेषच आहे. - प्राजक्त पोद्दार, नगरसेवक