कब्रस्थानसह इतर समस्या सोडविण्याचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 19:57 IST2024-05-18T19:56:47+5:302024-05-18T19:57:17+5:30
उल्हासनगरात ओमी टीमकडून मुस्लिम मेळावा

कब्रस्थानसह इतर समस्या सोडविण्याचे आश्वासन
उल्हासनगर : महायुतीचे श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारा निमित्त ओमी कलानी यांच्या ओमी टीमच्या वतीने रिजेन्सी येथे मुस्लिम मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी रात्री केले होते. यावेळी शिंदे यांनी कब्रस्थानसह इतर समस्या सोडविण्याचे आश्वासन मुस्लिम समाजाला दिले आहे.
उल्हासनगरात कलानी कुटुंब महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या पाठीमागे राहून प्रचार मोहीम राबविली. माजी आमदार पप्पु कलानी हे स्वतः प्रचारात उतरले होते. शुक्रवारी ओमी कलानी यांच्या ओमी टीमच्या वतीने रिजेन्सी हॉल येथे मुस्लिम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला कलानी समर्थक पदाधिकार्यासह मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याला श्रीकांत शिंदे यांनी मार्गदर्शन करून कब्रस्थानसह इतर समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. पप्पु कलानी यांनीही मार्गदर्शन करून श्रीकांत शिंदे यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन केले. तसेच शनिवारी सकाळी शिंदेंसेनेच्या युवासेनेने शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली.