ठाणे: आभासी चलनाची (क्रिप्टो करन्सी) निर्मिती करुन त्यात गुंतवणूकीचे अमिष दाखवून हजारो गुंतवणकदारांची फसवणूक करणाऱ्या टोळीपैकी तहा हाफीझ काझी (२६, कौसा, ठाणे) याला अटक केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली. या कारवाईमध्ये फ्लिनस्टोन ग्रुपच्या ठाणे आणि विक्रोळीतील कार्यालयातून ५३ लॅपटॉप, मोबाईल आणि बनावट दस्तऐवज अशी मोठी सामुग्री हस्तगत केल्याचेही त्यांनी सांगितले.ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील ‘बिझनेस ओरियन्ट पार्क’ येथे पहिल्या मजल्यावर असलेल्या ‘फ्लिनरस्टोन ग्रुप’चा सुत्रधार अमित लखनपाल
आभासी चलनाची निर्मिती करुन २५ हजार गुंतवणूकदारांना गंडा: टोळीपैकी एकास ठाण्यातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 19:03 IST
आभासी चलनामध्ये गुंतवणूकीचे अमिष दाखवून एक कोटी ७६ लाखांची फसवणूक करणाऱ्या तहा काझी याला ठाणे पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली. त्याने अशा २५ हजार जणांची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे.
आभासी चलनाची निर्मिती करुन २५ हजार गुंतवणूकदारांना गंडा: टोळीपैकी एकास ठाण्यातून अटक
ठळक मुद्देआभासी चलनामध्ये गुंतवणूकीचे अमिषएक कोटी ७६ लाखांची फसवणूक५३ लॅपटॉप, मोबाईल आणि बनावट दस्तऐवज हस्तगत