खासगी रुग्णालयांना ‘रेमडिसीवीर’ देणार उधारीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 00:20 IST2020-09-06T00:20:42+5:302020-09-06T00:20:54+5:30
कोरोनामुळे झालेले मृत्यूचे प्रमाण विचारात घेता सरकारने निर्देशित केलेल्या रिवाइज्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉलनुसार रुग्णांवर उपचार होणे आवश्यक आहे.

खासगी रुग्णालयांना ‘रेमडिसीवीर’ देणार उधारीवर
मीरा रोड : कोरोना रुग्णांना अत्यावश्यक औषध असलेले रेमडिसीवीर हे खाजगी रुग्णालयांना उधारीवर देण्याचा निर्णय
मीरा-भार्इंदर महापालिकेने घेतला आहे. खाजगी रु ग्णालयांतही कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. कोरोनाचे रुग्ण अथवा कोरोनामुळे झालेले मृत्यूचे प्रमाण विचारात घेता सरकारने निर्देशित केलेल्या रिवाइज्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉलनुसार रुग्णांवर उपचार होणे आवश्यक आहे. तशा सूचना कोविड रुग्णालयांना नियमित दिल्या जात आहेत.
औषध उपलब्ध होऊ न शकल्याने रुग्णांच्या उपचारांमध्ये अडथळा अथवा दिरंगाई होऊन रुग्णांची स्थिती गंभीर होणे अथवा
रुग्ण मृत झाल्याचे निदर्शनास येत असल्याने महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी आयुक्त डॉ. विजय राठोड यांना खाजगी रुग्णालयांना आवश्यकतेनुसार रेमडिसीवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी सूचना केली होती. त्या अनुषंगाने आयुक्तांनी खाजगी कोविड
रुग्णालयांना काही अपरिहार्य कारणास्तव रेमडिसीवीर औषध उपलब्ध न झाल्यास रु ग्णालयाच्या मागणीपत्राच्या आधारे आवश्यकतेनुसार उधारीवर पालिकेमार्फत औषध उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी सांगितले.
चढ्या दराने होते विक्री
कोरोना झालेल्या स्टेज २ बी व ३ मधील रु ग्णांकरिता रेमडिसीवीर इंजेक्शन हे अत्यावश्यक म्हणून निर्देशित केले आहे. परंतु, या इंजेक्शनची काळ्या बाजारात चढ्या दरात विक्र ी केली जात असल्याचे उघडकीस आले होते. तसेच रु ग्णांच्या नातलगांना हे इंजेक्शन वेळीच मिळत नाही वा त्यासाठी खूप शोधाशोध करावी लागत असल्याचे प्रकार नेहमीचे आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’नेही सविस्तर वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते.