ठाण्यात खासगी रुग्णालयाच्या परिचारकाची विष प्राशन करुन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 21:35 IST2022-01-14T21:31:54+5:302022-01-14T21:35:24+5:30
ज्युपीटर या खासगी रुग्णालयात परिचारक म्हणून काम करणाऱ्या इंद्रकुमार बुढाकाठी (२७, रा. घोडबंदर रोड, ठाणे) याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी समोर आली. इंद्रकुमारने नेमकी आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली? याचा तपास करण्यात येत असल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.

वसतीगृहातील निवासस्थानात घेतले विष
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ज्युपीटर या खासगी रुग्णालयात परिचारक म्हणून काम करणाऱ्या इंद्रकुमार बुढाकाठी (२७, रा. घोडबंदर रोड, ठाणे) याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी समोर आली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे.
ठाण्यातील ज्युपीटर रुग्णालयात परिचारक असलेला इंद्रकुमार हा कासारवडवलीतील एव्हरेस्ट कंट्री यार्ड या वसतीगृहात वास्तव्याला आहे. याच ठिकाणी त्याने १२ जानेवारी २०२२ रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास विष प्राशन केले. त्याला रात्री ८ वाजताच्या सुमारास उलटयांचा त्रास झाला, तेंव्हा हा प्रकार समोर आला. त्यावेळी त्याच्यासोबत राहणाºया काही मित्रांनीच त्याला ज्युपीटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरु असतांनाच त्याचा १३ जानेवारी रोजी सकाळी ८.४० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. रुग्णालयाने दिलेल्या माहितीच्या आधारे वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. हा गुन्हा आता कासारवडवली पोलीस ठाण्यात वर्ग होणार आहे. मुळचा विदर्भातील असलेल्या इंद्रकुमारने नेमकी आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली? याचा तपास करण्यात येत असल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले.