कसारा जवळ खासगी बसचा आपघात; १५ जण जखमी, जखमींची नावे आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 15:56 IST2025-01-26T15:48:21+5:302025-01-26T15:56:11+5:30

या अपघातात 20 हून अधिक जण जखमी झाले असून त्यापैकी 4 जणांची प्रकृती गभीर आहे.

Private bus accident near Kasara; 15 people injured | कसारा जवळ खासगी बसचा आपघात; १५ जण जखमी, जखमींची नावे आली समोर

कसारा जवळ खासगी बसचा आपघात; १५ जण जखमी, जखमींची नावे आली समोर

कसारा- मुंबई- नाशिक महामार्गावरील चिंतामण वाडी जवळ मुंबईहून सिन्नरला जाणाऱ्या टुरिस्ट बस क्रमांक एम एच 46 बी बी 2185 यावरील चालका चा गाडीवरील ताबा सुटल्याने एका वळणावर आपघात झाला. हा अपघात आज सकाळी ९ च्या सुमारास झाला.  या अपघातात २० हून अधिक जण जखमी झाले असून त्यापैकी ४ जणांची प्रकृती गभीर आहे. जखमींना पाठवण्यात आले असून अन्य जखमी वर खर्डी व कसारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 मिळालेली माहिशी अशी, मुंबई येथून नाशिक येथे लग्नाकरीता जात असताना  चिंतामण वाडी येथील वळनावर  टुरिस्ट बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले व बस एका नाल्यात पलटी झाली. या भीषण अपघाताची माहिती मिळताच  आपत्ती व्यवस्थापन टीम चे सदस्य गुरुनाथ वाताडे, बाळू मांगे, कैलास गतिर, फय्याज शेख, स्वप्नील  कलंत्री , अक्षय लाडक यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. 

कसारा पोलीस व शहापूर महामार्ग पोलीस यांच्या मदतीने नरेंद्रचार्य संस्थान रुग्णवाहिका व जिजाऊ रुग्णवाहिकेतून गंभीर जखमींना खर्डी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. किरकोळ जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.

जखमींची नावे अशी

1 भावेश राजगुरू वय22वर्ष
2 प्रतिभा सोनवणे वय25 वर्ष
3 मारुती सोनवणे वय 50 वर्षे
4 अशोक चिना भालेराव वय45 वर्षे
5 मेघा पालचंद वय 25 वर्ष
6 बळीराम गजाबा आढाळे वय 51 वर्ष
7 वंश अशोक भालेराव वय10 वर्ष
8 राहुल मारुती सोनवणे वय25 वर्ष
9 रंजना सोनवणे वय50 वर्षे
10 रुबीना शेख वय 29 वर्षे
11 मंगल विठ्ठल राजगुरू वय25 वर्षे 
12 सुकेशीनी राजू गुरू वय 23 वर्षे
13 नकुशा राजगुरू वय 38 वर्षे
14 स्वाती राजगुरू वय 20 वर्षे
15 राहुल श्रीधर करकर वय22  वर्ष.

हे जखमी असून या पैकी 4 जनाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या  बस चालकाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून बस चालकाच्या म्हणण्यानुसार बसला पाठीमागून  एका ट्रेलर ट्रक ने कट मारल्यामुळे बस वरील नियंत्रण सुटले असल्याची माहिती दिली.

Web Title: Private bus accident near Kasara; 15 people injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात