ठाणे कारागृहाच्या आवारातून कैदी पळाला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 21:39 IST2018-03-27T21:39:39+5:302018-03-27T21:39:39+5:30

खुनाच्या आरोपाखाली सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या पालघरच्या कैद्याने ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या आवारातून पलायन केले आहे. मन्वर मुल्ला असे या फरार आरोपीचे नाव असून त्याला आज न्यायालयातील सुनावणीनंतर कारागृहात नेत असताना त्याने पालघर पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पळ काढला.

Prisoners escaped from the jungle of Thane Jail | ठाणे कारागृहाच्या आवारातून कैदी पळाला 

ठाणे कारागृहाच्या आवारातून कैदी पळाला 

ठाणे - खुनाच्या आरोपाखाली सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या पालघरच्या कैद्याने ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या आवारातून पलायन केले आहे. मन्वर मुल्ला असे या फरार आरोपीचे नाव असून त्याला आज न्यायालयातील सुनावणीनंतर कारागृहात नेत असताना त्याने पालघर पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पळ काढला. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      
विरार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असलेला मन्वर मुल्ला (५०) याला आज कैदी पार्टीने न्यायालयात हजर केले. त्यानंतर सायंकाळी त्याला पुन्हा ठाणे मध्यवर्ती कारागृहात आणले असता त्याने पोलिसांच्या हाताला हिसका देऊन धूम ठोकली. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु असून त्यामुळे पुन्हा एकदा कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

Web Title: Prisoners escaped from the jungle of Thane Jail

टॅग्स :Crimeगुन्हा