एमआयडीसी भागात पायाभूत सुविधांना प्राधान्य द्या; मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना

By अजित मांडके | Published: February 9, 2024 08:15 PM2024-02-09T20:15:35+5:302024-02-09T20:16:08+5:30

एमआयडीसीमध्ये केवळ चांगली कंपनी असून चालणार नाही.

Prioritize infrastructure in MIDC areas Instructions of Chief Minister Shinde | एमआयडीसी भागात पायाभूत सुविधांना प्राधान्य द्या; मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना

एमआयडीसी भागात पायाभूत सुविधांना प्राधान्य द्या; मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना

ठाणे: एमआयडीसीमध्ये केवळ चांगली कंपनी असून चालणार नाही. तर, त्या कंपनीतील कर्मचाºयांना दळण-वळणासाठी चांगले रस्ते, पायाभूत सुविधा असल्या पाहिजते. या सर्व गोष्टी इको-सिस्टीममध्ये करतो. तेव्हा उद्योगाला चालना मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे एमआयडीसी भागात पायाभुत सुविधांना प्राधान्य द्या अशा सुचनाही त्यांनी एमआयडीसीला केल्या. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी- ४२ येथे बहुस्तरीय वाहनतळाच्या इमारतीचा भूमीपूजन समारंभ व "मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजनेचा"  (मेडिक्लेम पॉलिसी) शुभारंभ ठाणे येथे संपन्न झाला. त्यावेळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री बोलत होते. 

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, माजी आमदार रविंद्र फाटक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बिपिन शर्मा, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, विजय राठोड, एमआयटीएलचे एम.डी. श्री.मल्लिकनेर, स्थानिक पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते. दोन वर्षांपूर्वी आपण सर्वसामान्यांना अपेक्षित असलेले सरकार स्थापन केले. आपले राज्य गुंतवणुकीला अनुकूल राज्य आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात गुंतवणुक होऊ लागली आहे. यावर्षी ३ लाख ७३ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. राज्य सरकार हरित हायड्रोजनला प्राधान्य देत आहोत. स्वच्छता अभियान, इलेक्ट्रीक वाहनांना प्राधान्य देत आहोत त्यामुळे प्रदुषण कमी होत आहे. परदेशातील उद्योजक महाराष्ट्राकडे विश्वासाने पाहात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाठबळ आहे.

परवानग्यांना तात्काळ मंजूरी मिळते. डबल इंजिन सरकार राज्यात आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता योजनेमध्ये मागील सरकराच्या काळात अडीच कोटी रुपयांचे वाटप झाले होते. परंतु मागील दीड वर्षांत सुमारे १८० कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. हे पैसे जनतेचे आहेत. तसेच राज्यातील रुग्णालय टप्प्या-टप्प्याने कॅशलेश करणार असल्याचेही शिंदे म्हणाले. हे पैसे जनतेचे असल्याचे शिंदे म्हणाले. ठाण्यातील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कॅशलेस सेवा करण्यात आली आहे. आता राज्यातील रुग्णालयांमध्ये देखील टप्प्या-टप्प्याने कॅशलेस सेवा करणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एमआयडीसीच्या ४५० कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. तसेच एमआयडीसीतील सेवा निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना आरोग्य योजना लागू करण्यात आली. एमआयडीसी कर्चमचाऱ्यांच्या आठवी ते १० वीमध्ये शिकणाऱ्या मुलांना देखील टॅबचे देखील वाटप करण्यात आले. 

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी हा आजचा दिवस एैतिहासिक दिवस आहे. गेले १४ महिने हा महाराष्ट्र परकीय गुंतवणूकीमध्ये एक नंबर ला आहे. हे सर्व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे शक्य झाल आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मागणी करण्याअगोदरच त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत.

यावेळी सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना ३५० टॅब देण्यात येणार आहे. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात काही पाल्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. यापुढे दरवर्षी ८ ते १० मधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना टॅब वाटपाचे धोरण जाहीर करण्यात आले.औद्योगिक विकास महामंडळातील ४५० अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजनेचा" (मेडीक्लेम पॉलिसी) सुरु करण्यात आली. या विम्याचे हप्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरणार आहे.

Web Title: Prioritize infrastructure in MIDC areas Instructions of Chief Minister Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.