शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Prime Hospital Fire: प्राईम हॉस्पीटल दुर्घटना प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करणार; जितेंद्र आव्हाडांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 12:17 IST

Mumbra Hospital Fire: मुंब्रा येथील एम एस प्राईम क्रिटीकेअर या रुग्णालयामध्ये पहाटे आग लागून त्यात अतिदक्षता विभागातील 6 पैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाला.

ठाणे (प्रतिनिधी)-  मुंब्रा येथील एम एस प्राईम क्रिटीकेअर या रुग्णालयामध्ये पहाटे आग लागून त्यात अतिदक्षता विभागातील 6 पैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाला. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस, ठामपा अधिकारी आणि डॉक्टर यांची चौकशी समिती नेमण्यात येणार असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख तर जखमींच्या नातेवाईकांना एक लाखांचे अर्थसाह्य करण्यात येणार आहे, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली.

बुधवारी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी ही आग लागली होती. शॉट सर्किटमुळे आग लागण्याचे सांगण्यात येत आहे. या चौघांचा मृत्यु हा आगीमुळे नाही तर आगीच्या घटनेनंतर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले. त्यांना दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये हलविण्याच्या दरम्यान त्यांचा मृत्यु झाला असे ठाणे महापालिकेकडून सांगण्यात आले.  यास्मीन सय्यद (वय 46), नवाब शेख (वय 47) हलिमा सलमानी (वय 70) आणि हरीश सोनावणे (वय 57) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत.या दुर्घटनेची माहिती मिळताच अवघ्या 10 मिनिटातच गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी भेट दिली. येथील मृतांच्या कुटुंबियांना भेटून त्यांनी त्यांचे सांत्वन केले. प्रचंड अंधार दाटलेला असतानाही डॉ. आव्हाड यांनी जळीत रुग्णालयात प्रवेश करुन मदतीचे कार्य स्वत: हाती घेतले.  

या संदर्भात त्यांनी सांगितले की,  पहाटेच्या सुमारास कौसा येथील प्राईम रुग्णालयाला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे. एकंदर 20 रुग्ण होते. त्यातील 4 जण मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कशामुळे आग लागली, याची चौकशी  केली जाईल. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जखमींनाही एक लाख रुपये  दिले जातील. प्रामुख्याने ही घटना का घडली, कशी घडली? याची चौकशी  ठाणे महानगर पालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि डॉक्टर यांच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करुन अभिप्राय देतील.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याfireआगJitendra Awhadजितेंद्र आव्हाड