तोंड दाबून केली ‘त्या’ जुळ्या दिव्यांगांची हत्या, शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 04:57 IST2017-09-11T04:56:55+5:302017-09-11T04:57:22+5:30
कळवा, खारेगाव परिसरात आपल्या पोटच्या जुळ्या दिव्यांग मुलांची हत्या करून मातेने शनिवारी आत्महत्या केली. या मुलांची हत्या तोंड दाबूनच झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानंतर स्पष्ट झाल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.

तोंड दाबून केली ‘त्या’ जुळ्या दिव्यांगांची हत्या, शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल
ठाणे : कळवा, खारेगाव परिसरात आपल्या पोटच्या जुळ्या दिव्यांग मुलांची हत्या करून मातेने शनिवारी आत्महत्या केली. या मुलांची हत्या तोंड दाबूनच झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानंतर स्पष्ट झाल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.
खारेगाव येथील अनंत विहार कॉम्प्लेक्स येथील संदीप कदम यांचे अर्चना (३२) हिच्यासोबत सुमारे ८ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना सार्थक आणि वरद (७) अशी दोन जुळी मुले झाली. मात्र, दोघेही दिव्यांग होते. शनिवारी ९ सप्टेंबर रोजी अर्चना हिने दोन्ही मुलांना एका खोलीत मारून दुसºया खोलीत तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने सुसाइड नोटही लिहून ठेवल्याने तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले
होते. मात्र, त्यांना नेमके विष देऊन किंवा गळा दाबून हत्या केली, याबाबत शनिवारी रात्रीपर्यंत स्पष्ट झाले नव्हते.
रविवारी सार्थक आणि वरद या दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्या वेळी डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार दोघांची हत्या तोंड दाबल्याने गुदमरून झाल्याचे म्हटले आहे. त्यांचा व्हिसेराही राखून ठेवण्यात आल्याची माहिती ठाणे शहर परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक इर्शाद सय्यद करत आहेत.