शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
3
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
4
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
5
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
6
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
7
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
8
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
9
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
10
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
11
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
12
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
13
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
15
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

रंगीत फुलांनी खाल्ला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 12:38 AM

दर झाले चौपट । आवक झाली कमी, मागणी मात्र वाढली, अतिवृष्टीचा झाला परिणाम

ठाणे : गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी फुलांचे दर वाढतात. परंतु, यंदा झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम फुलांच्या आवकवर झाला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात फुल बाजारात फुलांची आवक कमी असली, तरी उत्सवानिमित्त मागणी भरपूर आहे. फुलांचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहेत. रंगीत फुलांना यंदा प्रचंड मागणी असल्याने त्यांचे दर चौपट झाले असल्याचे फुलविक्रेत्यांनी लोकमतला सांगितले.

सोमवारी गणरायाचे आगमन होणार आहे. यानिमित्ताने वीकेण्डला बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली आहे. या उत्सवानिमित्त शेवटची खरेदी असते, ती फुलांची. फुले ही लगेच खराब होत असल्याने त्याची खरेदी शेवटी करण्याकडे भक्तांचा ओढा असतो. श्रावण महिना सुरू झाला की, फुलांच्या दरांत वाढ होते. गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी हे भाव गगनाला भिडतात. यंदा अतिवृष्टीमुळे फुलांची पिके वाहून गेली असल्याने फुलांची आवक कमी झाली आहे. परंतु, फुलांना मागणी भरपूर असल्याचे फुलविक्रेते राजेश रावळ यांनी सांगितले. मोगऱ्याचा दर २००० रुपये प्रतिकिलो आहे. पिवळा गोंडा, केशरी-पिवळा कलकत्त्याला फक्त हारापुरतीच मागणी असते. परंतु, यंदा शेवंती, बिजली, लीली, केवडा यासारख्या रंगीबेरंगी फुलांना प्रचंड मागणी असल्याचे निरीक्षण फुलविक्रेत्यांनी नोंदवले. रविवारी या फुलांचे दर आणखीन वाढण्याची शक्यता रावळ यांनी वर्तवली आहे.फुलांची नावे फुलांचे दरपिवळा गोंडा ८० ते १०० रु. किलोकेशरी कलकत्ता १०० ते १२० रु. किलोपिवळा कलकत्ता १४० रु. किलोमोगरा २००० रु. किलोमोगºयाचा गजरा ३० रु.जाई-जुई १६० रु. किलोगुलछडी ४०० रु. किलोपिवळी / सफेद शेवंती ३०० रु. किलोबिजली २५० रु. किलोअष्टर ४०० रु. किलोकापरी १२० रु. किलोलीली ३० रु. बंडलकेवडा २५० ते ३०० रु. बंडलहिरवी शेवंती ३०० रु. किलोफुलांची नावे फुलांचे दरसाधी वेणी ५० ते १०० रु.गुलछडी वेणी १५० रु.अबोली वेणी १५० रु.चाफा ५ रु.दूर्वा १० रु.हिरवी सुपारी १० रु.शमीपत्र १० ते २० रु. जुडीतुळशी ३० ते ५० रु. बंडलसाधा गुलाब ८० रु. बंडलचायनीज गुलाब १५० रु. बंडलकंठी १०० ते ५०० रु.१०० फुले आली असली, तरी मागणी एक हजार फुलांची आहे, असे प्रमाण यंदा आहे. - राजेश रावळ, फुलविक्रेते 

टॅग्स :thaneठाणे