ओळख असल्याची बतावणी करीत ५० हजारांची सोनसाखळी लुबाडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 12:48 IST2021-12-10T12:47:10+5:302021-12-10T12:48:49+5:30

तुमच्या मुलीशी ओळख आहे, अशी बतावणी करीत कोपरीतील ७१ वर्षीय निर्मला नाखवा यांच्याकडील ५० हजारांची सोनसाखळी लुबाडल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.

Pretending to have an identity, a gold chain worth Rs 50,000 was looted | ओळख असल्याची बतावणी करीत ५० हजारांची सोनसाखळी लुबाडली

कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा

ठळक मुद्देकोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: तुमच्या मुलीशी ओळख आहे, अशी बतावणी करीत कोपरीतील ७१ वर्षीय निर्मला नाखवा यांच्याकडील ५० हजारांची सोनसाखळी लुबाडल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
ठाण्यातील कोपरी पूर्व भागात राहणाऱ्या निर्मला यांच्या घरात ९ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी भामटयाने बतावणी करीत विश्वास संपादन केला. नंतर कपटीपणाने त्यांच्या गळयातील अडीच तोळयांची सोनसाखळी त्याच्याकडे सुपूर्द करण्यास भाग पाडले. नंतर दिशाभूल करीत त्यांची सोनसाखळी घेऊन पोबारा केला. कोपरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनिष पठाणे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title: Pretending to have an identity, a gold chain worth Rs 50,000 was looted