Presence of 3 future teachers in Thane for Teacher Eligibility Exam | शिक्षक पात्रता परीक्षेला ठाण्यात ११७५६ भावी शिक्षकांची उपस्थिती

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ (महाटीईटी) रविवारी ठाण्यातील ४० परीक्षा केंद्रांवर

ठळक मुद्देठाणे शहरातील ४० परीक्षा केंद्रांवर ही टीईटी परीक्षादोन सत्रात ही ही परीक्षा घेण्यात आलीएक हजार ४९९ परीक्षार्थी गैरहजर

ठाणे : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ (महाटीईटी) रविवारी ठाण्यातील ४० परीक्षा केंद्रांवर दोन सत्रात घेण्यात आली. या परीक्षेला १३ हजार २५५ परीक्षार्थींपैकी ११ हजार ७५६ भावी शिक्षकांनी ही परीक्षा देऊन नशिब अजमावले आहेत. ठाणे व कळवा परीसरातील ४० केंद्रावर ही परीक्षा दोन सत्रात पार पडली असता यावेळी एक हजार ४९९ परीक्षार्थी गैरहजर असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी सांगितले.
         ठाणे शहरातील ४० परीक्षा केंद्रांवर ही टीईटी परीक्षा घेण्यात आली. दोन सत्रात ही ही परीक्षा घेण्यात आली. सकाळच्या पहिल्या सत्रातील पेपर एकला सात हजार ५९० परीक्षार्थींपैकी सहा हजार ७३१ जणांची उपस्थिती होती. उर्वरित ८५९ भावी शिक्षक या पात्रता परीक्षेला गैर हजर होते. पहिल्या सत्रातील ही परीक्षा २३ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. तर दुसऱ्या सत्रातील पेपर क्रमांक दोनसाठी पाच हजार ६६५ परीक्षार्थीपैकी पाच हजार २५ शिक्षक परीक्षेला उपस्थित होते. तर ६४०जण या दुसºया सत्रातील दुसºया पेपरसाठी गैरहजर होते. दुसºया सत्रातील ही परीक्षा दुपारी १७ केंद्रांवर घेण्यात आली होती. दोन्ही सत्रात घेण्यात आलेल्या या परीक्षेला कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सुतोवाच भागवत यांनी केले.

Web Title: Presence of 3 future teachers in Thane for Teacher Eligibility Exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.