महिला दिनी गर्भवती महिलेला 'यातना', एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात धावपळ; अखेर खासगी रुग्णालयात झाली प्रसूती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 12:00 IST2026-03-08T11:59:56+5:302026-03-08T12:00:45+5:30

वडकुन गावातील संबंधित गर्भवती महिलेला रविवारी (८ मार्च) मध्यरात्रीनंतर सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास प्रसूती वेदना सुरू झाल्या.

Pregnant woman 'tortured' on Women's Day, rushed from one hospital to another; finally delivered in a private hospital | महिला दिनी गर्भवती महिलेला 'यातना', एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात धावपळ; अखेर खासगी रुग्णालयात झाली प्रसूती

महिला दिनी गर्भवती महिलेला 'यातना', एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात धावपळ; अखेर खासगी रुग्णालयात झाली प्रसूती

- हितेन नाईक, पालघर 
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशीच डहाणू तालुक्यातील वडकुन परिसरातील एका गर्भवती महिलेला बाळंतपणासाठी मध्यरात्री डहाणूच्या कॉटेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टर उपलब्ध नसल्याने नाईलाजाने त्या महिलेला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्याची पाळी तिच्या नातेवाईकावर ओढवली. अखेर पहाटे तीनच्या सुमारास खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिची सिझेरियन प्रसूती करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, वडकुन गावातील संबंधित गर्भवती महिलेला रविवारी (८ मार्च) मध्यरात्रीनंतर सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यानंतर तिला तातडीने डहाणू येथील शासकीय कॉटेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तेथे नॉर्मल डिलिव्हरी होणार नसल्याचे सांगून तिला तात्काळ दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. तसेच ॲम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याने उशीर होईल अशी माहिती देण्यात आल्याने नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

यानंतर अंगणवाडी सेविका आणि स्थानिकांच्या मदतीने महिलेला खासगी रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ सुरू करण्यात आली. सर्वप्रथम एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अन्य रुग्णालयात ही डॉक्टर उपलब्ध नसल्याने शेवटी त्या महिलेला अन्य एका तिसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल होण्याची संधी मिळाली.

श्रद्धा नर्सिंग होम येथे डॉक्टरांनी तातडीने उपचार करत महिलाची सिझेरियन प्रसूती केली. या प्रसूतीत ३.१७० किलो वजनाच्या बाळाचा जन्म झाला असून, आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती सध्या चांगली असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, संबंधित महिला मागील नऊ महिन्यांपासून कॉटेज रुग्णालयात नियमित तपासणी आणि उपचार घेत होती. मात्र ऐन बाळंतपणाच्या वेळी सरकारी रुग्णालयात आवश्यक डॉक्टर उपलब्ध नसल्याने तिला अशा प्रकारे एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात धावपळ करण्याची पाळी ओढवल्याने नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

महिला दिनाच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध असल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्षात मात्र डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे गर्भवती महिलांना अशा धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले आहे.

Web Title : महिला दिवस पर गर्भवती महिला की पीड़ा: प्रसव के लिए अस्पतालों के चक्कर।

Web Summary : महिला दिवस पर, दहानू में एक गर्भवती महिला को भयावह अनुभव हुआ। सरकारी अस्पताल में डॉक्टरों की अनुपलब्धता के कारण, परिवार को निजी अस्पतालों के बीच चक्कर काटना पड़ा, अंततः सी-सेक्शन डिलीवरी के लिए एक अस्पताल मिला। माँ और बच्चा स्वस्थ हैं।

Web Title : Pregnant woman's ordeal on Women's Day: Hospital hopping for delivery.

Web Summary : On Women's Day, a pregnant woman in Dahanu faced a harrowing experience. Due to unavailability of doctors at the government hospital, the family was forced to shuttle between private hospitals before finally finding one for a C-section delivery. The mother and baby are healthy.