शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात निरव मोदीच्या प्रतिमेला जोड्यांचा प्रसाद, ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 15:05 IST

निरव मोदी याच्या विरोधात ठाण्यात राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी याच्या प्रतीमेला जोड्यांचा प्रसाद संतप्त कार्यकर्त्यांनी दिला.

ठळक मुद्देरात्री पंजाब नॅशनल बँकेच्या बोर्डाला फासले काळेया घोटाळ्याला पीएनबी व्यवस्थापनही जबाबदार

ठाणे - सुमारे १३ हजार कोटी रूपये लुटून परागंदा झालेल्या निरव मोदी याच्या कारनाम्याला पंजाब नॅशनल बँकही जबाबदार आहे, असा आरोप करीत, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. दरम्यान, डावोसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत निरव मोदी छायाचित्रकाढून घेतो; पंतप्रधान मोदी यांच्या नाकाखाली हे भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे मन की बात करणाºया पंतप्रधानांनी आता जनिहत की बात करावी, असा टोला परांजपे यांनी लगावला.              पीएनबीमध्ये सुमारे १२ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. एवढी रक्कम पीएनबीने निरव मोदी याला मंजूरच कशी केली. असा सवाल उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पीएनबीच्या नौपाडा शाखेसमोर जोरदार निदर्शने केली. बडा मोदीने हात दिया... छोटा मोदी भाग गया; ललित, मल्ल्या, मोदी ... सब भ्रष्टाचार के साथी; गरीबांचा पैसा लुटतो कोण... मोदीशिवाय आहेच कोण आदी घोषणा देत राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदीच्या प्रतिमेला चप्पलांनी बडवण्यात आले. या आंदोलनात पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक करून सुमारे ११,४०० कोटी रु पयांचा घोटाळा करून सर्व सामान्य जनतेच्या पैशावर डल्ला मारणाºया निरव मोदी व पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाºयांचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना आनंद परांजपे यांनी सांगितले की, एवढा मोठा घोटाळा होत असताना पीएनबीचे व्यवस्थापन शांत का बसले होते? याचा विचार केला पाहिजे. गोरगरिबांनी आपल्या घामाचा पैसा बँकेत ठेवला होता. आता ही बँक दिवाळखोरीत जाणार आहे. या गोरगरिबांना त्यांचा पैसा कोण देणार, याचा जाब विचारण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले आहे. या घोटाळ्याला जसे पीएनबी व्यवस्थापन जबाबदार आहे; तसेच सरकारही आहे. बिगर शासकीय बँकांवर सरकारचे नियंत्रण नसल्याचे या घोटाळ्यामुळे सिद्ध झाले आहे. भ्रष्टाचार मुक्त भारत करायची भाषा करायची आणि निरवला बाजूला बसवायचे, असा प्रकार पंतप्रधान करीत आहेत. त्यामुळे त्यांनी आता जबाब दिलाच पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

  • शुक्र वारी रात्री उशिरा ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्य कार्यकर्त्यांनी पंजाब नॅशनल बँकेच्या बोर्डाला काळे फासले. ठाण्यातील गोखले रोडवर मल्हार सिनेमागृहाजवळ पंजाब नॅशनल बँकेची शाखा आहे.

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस