शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

भाजपा विरोधातून राजकीय उलथापालथीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 1:00 AM

ठाणे जिल्हा परिषदेच्या राजकारणात भाजपाला बाजूला ठेवत शिवसेना-राष्ट्रवादीची स्थापन झालेली सत्ता आणि निवडणुकीत त्यांना काँग्रेसने दिलेली साथ यामुळे केवळ जिल्हा परिषदेचेच राजकारण बदलले असे

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या राजकारणात भाजपाला बाजूला ठेवत शिवसेना-राष्ट्रवादीची स्थापन झालेली सत्ता आणि निवडणुकीत त्यांना काँग्रेसने दिलेली साथ यामुळे केवळ जिल्हा परिषदेचेच राजकारण बदलले असे नव्हे, तर येत्या काळातील लोकसभा-विधानसभा निवडणुकीतील राजकीय उलथापालथीची ही नांदी मानली जाते. यामुळे नजिकच्या काळात उमेदवारांचे पक्षांतर, लोकसभेचे उमेदवार विधानसभेला; तर विधानसभेतील काही चेहरे लोकसभेला पाहायला मिळतील. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यातील मतदारांचा कल या निवडणुकीतून समोर आला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या चार पक्षांच्या एकत्रिकरणाचा नवा ठाणे पॅटर्न अस्तित्त्वात आल्याने भाजपाला आपल्या राजकारणाचा पॅटर्न बदलावा लागणार आहे.लोकसभा, विधानसभा निवडणूक असो की स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी... निवडून येण्याच्या क्षमतेचे उमेदवार भाजपाने फोडायचे आणि कोणत्याही परिस्थितीत आपली सत्ता स्थापन करायची हा पायंडा ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने मोडून काढला. ते करताना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, रिपब्लिकन पक्षाचा सेक्यूलर गट यांची महायुती केली. परस्परांशी कोणतीच वैचारिक किंवा तात्त्विक बांधिलकी नसतानाही केवळ ‘भाजपा विरोध’ या एककलमी कार्यक्रमाखाली हे पक्ष एकत्र आल्याने नवे राजकारण प्रत्यक्षात आले.भाजपाच्या आक्रमकपणाला वेसण घालण्यासाठी भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीपासून सुरू झालेला हा सिलसिला अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रत्यक्षात आला. राज्यात कुठेही रोखला न गेलेला भाजपाच्या सत्तेचा वारू ठाणे जिल्हा परिषदेत चार पक्षांनी एकत्र येत रोखला आणि ‘भाजपालाही तुम्ही हरवू शकता’ ही घोषणा प्रत्यक्षात आणली. भाजपाने मुरबाड पंचायतीत सत्ता स्थापन केली, पण तो पक्षापेक्षा आमदार किसन कथोरे यांच्या राजकारणाचा करिष्मा होता. कल्याण पंचायतीतील भाजपाची सत्ता ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्त्वाची महत्त्वाकांक्षा होती. भिवंडी पंचायतीत काँग्रेसचे उमेदवार फुटल्याने भाजपाला लॉटरी लागली असली, तरी त्यात भाजपाचे कसब कमी आणि नव्या राजकारणाची फेरजुळणीच अधिक आहे.वेगवेगळ््या प्रकल्पांमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असलेली खदखद, शेतकरी- कामगारांचा विरोध, नोकरदारांत वाढलेली असुरक्षिततेची भावना या साºयांचे कमी-अधिक प्रतिबिंब या निवडणुकीत पडले. भिवंडी महापालिका निवडणुकीवेळी मुस्लिमविरोध समोर आला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कुणबी समाज एकवटला. दलित-आदिवासी समाजाची मते फिरली. त्यामुळे अपेक्षेपेक्षा वेगळे निकाल लागले. ग्रामीण मतदारांतील शिवसेनेचा पाया विस्तृत झाला. मागील निकालांशी तुलना करता भाजपाला चांगले यश मिळाले असले तरी तो पक्षाचा नव्हे, तर बाहेरून पक्षात आलेल्या नेत्यांचा करिष्मा असल्याचे दिसून आले. चार पक्ष आणि अन्य काही गटा-तटांची मोट आपल्याविरोधात बांधली जाऊ शकते, याचा गांभीर्याने विचार करून भाजपाला आपल्या राजकारणाची दिशा बदलावी लागेल.संघ परिवाराचे काम महत्त्वाचेनवभाजपावाद्यांनी संघाशी आणि परिवारातील अनेक संघटनांशी गेल्या तीन वर्षांत फटकून राहण्याचा, अंतर राखण्याचा प्रयत्न केला. त्याचा फटका त्यांना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत भोगावा लागला. त्यामुळे हिंदू चेतना दिवसापासून त्यांनीही परिवाराच्या उपक्रमात सहभागी होत या संघटनांशी मिळतेजुळते घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपा उमेदवारांना पाठिंब्याचे जे धोरण ठरेल ते ठरेल, तोवर किमान परिवारवाद्यांची नाराजी नको, या भावनेतून अनेकांनी स्वयंसेवक होण्यास सुरूवात केली आहे.आणखी एक मंत्रीपद?जिल्ह्यात शिवसेनेकडे कॅबिनेट मंत्रिपद आहे, तर भाजपाकडे राज्यमंत्रीपद आहे. लवकरच होणाºया मंत्रीमंडळ विस्तारात पक्षाला आणखी एक मंत्रीपद मिळावे, असा प्रयत्न सुरू आहे. तसे झाले तर त्याचा पक्षाला उपयोग होईल, असे म्हणणे मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात आले आहे. मागील विस्तारावेळी संजय केळकर आणि किसन कथोरे यांची नावे चर्चेत होती. पण फक्त रवींद्र चव्हाण यांना संधी मिळाली.श्रमजीवीचेचुकलेले पाऊलआयत्यावेळी भाजपाला पाठिंबा देऊन श्रमजीवी संघटनेला फार फायदा झाला नाही. त्यांच्या उमेदवारांना भाजपाच्या चिन्हावर लढावे लागले. त्यात अवघी एक जागा पदरात पडली, भाजपाचा फायदा झाल्याने संघटनेतील धुसफूस बाहेर पडली. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी शिवसेनेला साथ दिली. त्यामुळे हे चुकलेले गणित श्रमजीवीला सुधारावे लागेल.

टॅग्स :BJPभाजपा