भिवंडीत तीन मजली इमारतीचा काही भाग चाळीवर कोसळला; एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 06:42 IST2018-07-24T23:07:46+5:302018-07-25T06:42:15+5:30
ढिगाऱ्याखालून आठ जणांची सुटका; मदतकार्य सुरू

भिवंडीत तीन मजली इमारतीचा काही भाग चाळीवर कोसळला; एकाचा मृत्यू
ठाणे: भिवंडीत तीन मजली इमारतीचा काही भाग चाळीवर कोसळला आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आठ जणांची सुटका केली आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वप्रथम घटनास्थळी धाव घेतली. यानंतर एनडीआरएफचं एक पथकदेखील मदतकार्यात सहभागी झालं.
#Maharashtra: Portion of a three-storey building collapses in Bhiwandi's Rasulbagh, few people suspected to be trapped. Fire brigade present at the spot. pic.twitter.com/gBJqutwYnN
— ANI (@ANI) July 24, 2018
भिवंडीतील रसुला बाग भागातील तीन मजली इमारतीचा काही भाग शेजारच्या चाळीवर कोसळला. रात्री साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. इमारत शेजारच्या चाळीवर कोसळल्यानं काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले होते. अग्निशमन दल, एनडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं ढिगाऱ्याखालून आठ जणांची सुटका केली. मरीयम शेख (9 वर्षे), शफियाबी युसूफ (60 वर्षे), मुन्नाभाई चावला (45 वर्षे), मेहरुनिसा शेख (40 वर्षे) झरार अहमद शेख (45 वर्षे), उमर इस्माईल सय्यद (2 वर्षे), खातुनबी सय्यद (45 वर्षे) आणि आयुब सय्यद (63 वर्षे) अशी ढिगाऱ्याखालून सुटका केलेल्या व्यक्तींची नावं आहेत.
#Maharashtra: Three people rescued, five people feared trapped; One NDRF team moved to the spot of the incident in Bhiwandi. https://t.co/GcBzEGv6ox
— ANI (@ANI) July 24, 2018